July 27, 2024
FSSAI cautionary warning to fruit traders
Home » फळ व्यापाऱ्यांना एफएसएसएआय‘चा खबरदारीचा इशारा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

फळ व्यापाऱ्यांना एफएसएसएआय‘चा खबरदारीचा इशारा

फळे पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडच्या वापरावरील प्रतिबंधाचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी एफएसएसएआय‘ने फळ व्यापाऱ्यांना दिला खबरदारीचा इशारा

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) फळांचे व्यापारी, फळे हाताळणारे, अन्नपदार्थांचे व्यवसायिक (FBOs) तसेच फळे पिकविणाऱ्या केंद्रांचे चालक यांना, विशेषत: आंब्याच्या हंगामात, फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावरील प्रतिबंधाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. एफएसएसएआय’ने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा विभागांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे, तसेच अन्नसुरक्षा आणि मानके कायदा, 2006 आणि त्यानुसार बनवलेल्या नियम आणि विनियमांच्या तरतुदींनुसार अशा बेकायदेशीर पद्धतींमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीविरुद्ध (व्यक्तींविरुद्ध) कठोर कारवाई करावी, असे सुचवले आहे.

Guidelines for Chemical use in fruits
Guidelines for Chemical use in fruits

सामान्यतः आंब्यासारखी फळे पिकवण्यासाठी वापरले जाणारे कॅल्शियम कार्बाइड वातावरणात ॲसिटिलीन वायू सोडते. ॲसिटिलीनमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे हानिकारक अंश असतात. ‘मसाला’ म्हणूनही ओळखले जाणाऱ्या या पदार्थांमुळे चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, चिडचिड, अशक्तपणा, गिळायला त्रास होणे, उलट्या होणे आणि त्वचेवर फोड येणे इत्यादी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शिवाय, ऍसिटिलीन वायू, तो हाताळणाऱ्यांसाठी देखील तितकाच घातक आहे.  कॅल्शियम कार्बाइड वापरताना ते फळांच्या थेट संपर्कात येण्याची तसेच आर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश फळांवर शिल्लक राहण्याची शक्यता असते.

या धोक्यांमुळे, फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवर प्रतिबंध आणि निर्बंध) विनियम, 2011 च्या नियमन 2.3.5 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या कॅल्शियम कार्बाइडच्या सर्रास वापराचा मुद्दा लक्षात घेऊन, एफएसएसएआय’ने भारतात फळे पिकण्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून इथिलीन वायूचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.  इथिलीन वायूचा वापर पीक, विविधता आणि परिपक्वता यावर अवलंबून असून 100 पीपीएम (100 μl/L) पर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो.

याशिवाय, केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (CIB आणि RC) ने आंबा आणि इतर फळे एकसमान पिकवण्यासाठी इथेफॉन 39% SL ला मान्यता दिली आहे.

एफएसएसएआय’ने “फळे कृत्रिमरित्या पिकवण्याची पद्धत – इथिलीन वायु, फळे पिकवण्याचा एक सुरक्षित पर्याय” (https://www.fssai.gov.in/upload/uploadfiles/files/Guidance_Note_Ver2_Artificial_Ripening_Fruits_03_01_2019_Revised_10_02_2020.pdf) ही मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेतील प्रक्रियेचे अनुसरण करून फळे कृत्रिमरीत्या पिकवावीत, अशी सूचना दिली आहे. 

कॅल्शियम कार्बाइडचा वापर किंवा फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी पिकवणारे घटक वापरण्याची कोणतीही चुकीची प्रथा ग्राहकांच्या निदर्शनास आल्यास, अशा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांचे तपशील खालील लिंकवर उपलब्ध आहेत: https://www.fssai.gov.in/cms/commissioners-of-food-safety.php.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी बालकविता

मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे अरविंद गोखले, विद्याधर निमकर यांना पुरस्कार

संसदेत मोदी विरुद्ध गांधी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading