March 27, 2023
Gandha Pawasacha Poem by arvind dhawalikar
Home » गंध पावसाचा…
कविता

गंध पावसाचा…

गंध पावसाचा            

सांग पावसाच्या थेंबा गंध तुझा की मातीचा
यात चाहूल उद्याची कां हा आठव स्मृतींचा

जन्म जन्माचं गुपीत 
गेली पहाट सांगून
भर दुपारी उन्हांत
गेले तारुण्य जळून
सांज तुझ्या सवे देई का रे सांगावा प्रितिचा ?

सुख वाऱ्या संगे गेले
दु: ख फुलांनी टिपले
माझ्या ऒंजळीत आतां
मोत्या विनाच शिंपले
इथे न्याय ज्याचा त्याचा रे वेगळ्या नितिचा

देशी मातीत सांडून
क्षणी आकाश खुणांना
गंध जिवनाचा येई
इथे संपल्या क्षणांना
तुला सांगेल कां कोणी अर्थ तुझ्या या भॆटिचा ?
सांग पावसाच्या थेंबा गंध तुझा की मातीचा ?

कवी - अरविंद ढवळीकर

Related posts

संक्रात

मौनातल्या कळ्यांना, थेट भेटलेलंच बरं असतं…

प्रयत्नात परमेश्वर…

Leave a Comment