October 18, 2024
Garlic plantation agriculture advice
Home » Privacy Policy » अशी करा लसूण लागवड
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अशी करा लसूण लागवड

लसूण लागवड करण्यासाठी प्रथम शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे तयार करण्यापूर्वी एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन कोंबडी खत किंवा ३ टन गांडूळ खत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.

ट्रॅक्टरला जोडता येणाऱ्या सरीयंत्राने १२० सें.मी. रुंद, ४०-६० मीटर लांब आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये ४५ सें.मी. अंतर ठेवावे. रुंद गादीवाफ्यांची पद्धत ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता सोयीची आहे.

ठिबक सिंचनासाठी प्रत्येक गादीवाफ्यामध्ये इनलाईन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या दोन लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रिपरमध्ये ३०-५० सें.मी. अंतर असावे. तसेच त्याची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी.

तुषार सिंचनासाठी लॅटरलमध्ये (२० मि.मी.) ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे.

लागवडीकरीता १.५ ग्रॅम वजनाच्या पाकळ्या निवडाव्यात. लहान, पोचट, रोगट लसूण कळ्या निवडू नयेत. बुरशीजन्य रोग व फुलकिडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, कार्बेंडाझीम १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणात लसूण पाकळ्या दोन तास बुडवून नंतर लागवड करावी.

लसूण पाकळ्या टोकण पद्धतीने १५ x १० सें.मी. अंतरावर व २ सें.मी. खोलीवर उभ्या लावाव्यात. एकरी १६० ते २०० किलो कळ्या लागतात. लागवडीपूर्वी किंवा लागवडीवेळी ऑक्‍सिफ्लोरफेन (२३.५ ईसी) २ मि.लि. किंवा पेंडीमिथेलीन (३० ईसी) ४ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकांचा वापर करावा.

(सौजन्य – कृषक कृषी सल्ला)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading