मी नि ती
तुझ्यात कुठं उरलोय मी आता
तेच शोधतो मी आता जाता जाता
दिलेली वचने आता विरून गेली
मला पाहून आज ती दुरून गेली
वचनांची तीने राख केली
नि दिलेल्या शब्दांची केली तीने होळी
पण दोघांचा मीपण गळला जर
दोघांनीही एक एक पाऊल पुढे टाकलं तर
जाता जाता एकमेकांत आपण उरणार आहे
संकटातून आपलं प्रेमच तरणार आहे
आपल्यातील दुरावा आज टळणार आहे
अहंकार नि गर्व सारं गळणार आहे
मन तुझं नि माझं जुळणार आहे
प्रेमाची बाग आज छान फुलणार आहे
मत्सर, राग, द्वेष यांना मातीत पुरणार आहे
आपल्यात फक्त प्रेमच उरणार आहे…
कवी – चंद्रकांत पाटील, 90298 60193
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.