March 29, 2024
Dr Kisan Patil Literature award 2023 for Novel
Home » प्राचार्य किसन पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

प्राचार्य किसन पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्कार, २०२३ यंदा कादंबरी या साहित्यप्रकारासाठी देण्यात येणार आहे.

मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांच्यावतीने वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा जामनेरचे कार्याध्यक्ष डॉ. संदीप कडू माळी व प्राचार्य किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्या वतीने डॉ. वासुदेव वले यांनी केले आहे.

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अकरा हजार रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेश वाङ्मय पुरस्कारासाठी पाच हजार रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

सन २०२१ पासून हे पुरस्कार दिले जातात. २०२१ साली कथा व २०२२ साली कविता या वाङ्मय प्रकारांसाठी हे पुरस्कार दिले गेले. २०२३ साठी हे दोन्ही पुरस्कार कादंबरी ह्या वाङ्मय प्रकारासाठी दिले जाणार आहेत. तेव्हा ह्या दोन्ही वाङ्मय पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ मध्ये प्रकाशित कादंबरीच्या दोन प्रती लेखकाच्या फोटो, परिचय पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी ३१ जानेवारी, २०२३ पर्यंत डॉ.अशोक कौतिक कोळी, गणपती नगर सेक्टर-३, जळगाव रोड, जामनेर जि. जळगाव-४२४ २०६ संपर्क : 9421568427 या पत्त्यावर पाठवावे.


Related posts

सामाजिक वास्तवाचे सशक्त चित्रण: काळोखाचे कैदी

..हा तर सरकारी दरोडेखोरीचा कायदा

बहुसांस्कृतिक समाजात एकजिनसीपणासाठी अनुवाद महत्त्वाचा: डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये

Leave a Comment