जी गोरगरिबांची नव्हती
सामान्य माणसाची नव्हती
जी भिक मागणार्या
भिक्षुकाची कधीच नव्हती
ती गेली म्हणजे का शेतकर्याच्या मालाला
सोन्याचा दर आला की
कुणाच्या चुली बंद पडल्या
की आभाळ कोसळलं ?
ती बदनाम बदचलन तरी
धनिकांना अमृताचा घोट आहे
म्हणून तर आरबीआयचा
तिच्याशी घटस्फोट आहे
तुम्हाला सत्तेचा खेळ खेळत
नोटबंदीआड दडायचं आहे
आम्हाला तर रोज आभाळाकडे बघत
महागाईशी लढायचं आहे.