आपल्याकडे घरात अनेक टाकावू वस्तू असतात. पण त्याचा उपयोग आपण कोठेच करत नाही. हा कचरा आपल्या घराचे सौंदर्य सुद्धा बिघडवतो. त्यामुळे हा कचरा फेकून देणे किंवा भगारात देणे याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला तर अशा कचऱ्याचाही सुंदर वापर आपण करु शकतो.
कोल्हापूर गार्डन्स क्लबच्या सदस्या कल्पना थोरात यांची ही बाग पाहून आपणास त्याचा प्रत्यय निश्चितच येईल. त्यांनी चक्क टाकाऊ वस्तुपासुन सुध्दा आपली बाग सजवली आहे. त्यांनी ही बाग कशी सजवली आहे आणि टाकावू वस्तूंचा पुर्नवापर त्यांनी कसा केला आहे. हे जाणून घेऊया त्यांच्याचकडून या व्हिडिओच्या माध्यमातून…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.