October 4, 2024
Know about Ramsar Sites in India
Home » Privacy Policy » रामसर साईट्‌स म्हणजे काय ? त्या कोणत्या ?
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रामसर साईट्‌स म्हणजे काय ? त्या कोणत्या ?

निसर्गातील चमत्कार, वेगळेपण दाखवणाऱ्या अनेक वास्तू, ठिकाणे या पृथ्वीतलावर पाहायला मिळतात. काही नैसर्गिक आहेत, तर काही कृत्रिम; पण जैवविविधतेच्या दृष्टीने यांचे महत्त्व कायम आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या वास्तूंची आणि ठिकाणांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांना एक वेगळा दर्जा देण्यात आला आहे. कोणती आहेत ही ठिकाणे ? केव्हा ठरले या संदर्भात? आदीसंदर्भात माहिती देणारा हा लेख…

– राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

1971 मध्ये इराणमधील रामसर या ठिकाणी पाणथळ जागांच्या संदर्भात एक परिषद झाली होती. या परिषदेत सहभागी देशांनी पाणथळ जागांच्या संवर्धनासंदर्भातील करारावर सह्या केल्या होत्या. 1975 मध्ये युनेस्कोने यात सहभाग नोंदवत संवर्धनासाठी काम केले. सध्या जवळपास सुमारे 171 देशांचा रामसर परिषदेमध्ये सहभाग असतो. भारताने रामसर परिषदेमध्ये 1982 पासून सहभाग नोंदविला आहे.

1960 मध्ये युरोपात पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे लक्षात आले. ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे, असे लक्षात घेऊन 1962 मध्ये मार्शलॅन्ड आणि पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी एमएआर परिषद भरवण्यात आली. येथूनच खऱ्या अर्थाने संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर 1971 मध्ये रामसर परिषद घेण्यात आली. यामध्ये पाणथळ जागा संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन अठरा देशांनी संवर्धनावर सहमती दर्शवली. 1974 मध्ये ऑस्ट्रेलियातील कोबोर्ग पेन्युसुलाच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. जगातील ही संवर्धनासाठी निवडण्यात आलेली पहिली पाणथळ जागा ठरली. ती जागा रामसर साईट्‌स या नावाने जाहीर करण्यात आली.

भारताने 1982 मध्ये यामध्ये सहभाग नोंदविला. आत्तापर्यंत भारतातील 42 पाणथळ जागांचा रामसर साईट्‌समध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास सुमारे 10 लाख 81 हजार 438 हेक्‍टर इतके क्षेत्र यामध्ये मोडते. यात 1 लाख 16 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रावर व्यापलेले ओरिसातील चिलिका सरोवर हे भारतातील सर्वांत मोठे रामसर साईट्‌सचे क्षेत्र आहे, तर अवघ्या 20 हेक्‍टरवर व्यापलेले हिमाचल प्रदेशातील रेणुका वेटलॅंड हे भारतातील सर्वांत लहान रामसर साईट आहे. चिलिका सरोवर आणि राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिल्या रामसर साईट्‌स आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक आठ जागांना रामसर साईट्‌सचा दर्जा देण्यात आला आहे.

अशा आहेत भारतातील रामसर साईट्‌स

असन राखीव संवर्धन (उत्तराखंड)
अष्टमुडी वेटलॅंड (केरळ)
बीन्स राखीव संवर्धन (पंजाब)
भीतरकनिका मॅनग्रो (ओरिसा)
भोज सरोवर (मध्यप्रदेश)
चंद्राताल (हिमाचल प्रदेश)
चिलिका सरोवर (ओरिसा)
दिपोर भील (आसाम)
पूर्व कोलकत्ता वेटलॅंड (पश्‍चिम बंगाल)
हरिक वेटलॅंड (पंजाब)
होकेरा वेटलॅंड (जम्मू-काश्‍मीर)
कबरताल वेटलॅंड (बिहार)
कांजली वेटलॅंड (पंजाब)
केवलादेव राष्ट्रीय उद्यान (राजस्थान)
केशोपूर मिनाई (पंजाब)
कोल्लेरू तलाव (आंध्रप्रदेश)
लोकतक लेक (मणिपूर)
लोणार लेक (महाराष्ट्र)
नालसरोवर पक्षी अभयारण्य (गुजरात)
नंदूर माधमेश्‍वर (महाराष्ट्र)
नांगल वन्यजीव अभयारण्य (पंजाब)
नवाबगंज पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
पार्वती आग्रा पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
पॉईंट कॅलिमेरी वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य (तमिळनाडू)
पॉंग डॅमलेक (हिमाचल प्रदेश)
रेणुका लेक (हिमाचल प्रदेश)
रोपर वेटलॅंड (पंजाब)
रुद्रसागर लेक (त्रिपुरा)
सामान पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
समासपूर पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
सांबर लेक (राजस्थान)
संडी पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
सारसी नवर झिल (उत्तर प्रदेश)
सासथामकोट्टा लेक (केरळ)
सुंदरबन वेटलॅंड (पश्‍चिम बंगाल)
सुरिनसार मन्सूर लेक (जम्मूृ-काश्‍मीर)
सुर सरोवर (उत्तर प्रदेश)
सोमिरिरी (जम्मू-काश्‍मीर)
तुसो कर (लडाख)
अप्पर गंगा नदी (उत्तर प्रदेश)
वेमबंदकोल वेटलॅंड (केरळ)
उलर लेक (जम्मू-काश्‍मीर)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading