📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 31, 2026
चलचित्र

प्रयोगभूमीत भात लावणी श्रमसोहळा …

रत्नागिरीतील कोळकेवाडी येथे भात लावणीचा श्रमसोहळा; शहरातील स्वयंसेवक, विद्यार्थी व शिक्षक यांनी घेतला शेतीचा अनुभव.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी येथील प्रयोगभूमीत गेले आठवडाभर भात लावणीचा उपक्रम राबविण्यात आला. पॉवर टिलरने नांगरणी करणे, भाताची तयार केलेली रोप काढणे, शेतात माजलेले गवत काढणे, गिरिपुष्पाचा पाला टाकणे आणि रोपांची लावणी करणे अशी कामे चालली. या कामात प्रयोग भूमीतील मोठी मुले, माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग घेतला.

सलग तीन चार तास चिखलात ओणवे राहून काम करणे नवख्यांसाठी अवघड असते. मात्र मुले, शिक्षक त्यासाठी सरावलेले. संध्याकाळी नदीत डुंबल्यावर सारा शिण जातो. या लावणीसाठी प्रयोगभुमीतर्फे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी पुण्याहून सागर चितळे या कामात सामील झाले. त्यानंतर एक दिवस चिपळूणमधील नेत्रविकार तज्ञ व सायकलीस्ट डॉ. मनिषा वाघमारे त्यांच्या स्नेही निलांबरी खोंड, ज्योती परांजपे, मंजुषा काणे यांच्यासह या कामात सहभागी झाल्या. भात लावणी हा श्रमसोहळा असतो. एक आगळावेगळा अनुभव असतो. या सोहळ्यात शहरातील व्यक्तींना शेतीचा आनंद घेण्याची संधी मिळते.

Related posts

शिल्पकलेतील महिला…

आश्चर्यकारक ! कडा सर करणारा वीर

कृष्णरुपातील गणेश…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406