July 27, 2024
Kriya Palate Tatkal Story By Avinash Halbe
Home » क्रिया पालटे तात्काळ…(भाग – १)
मुक्त संवाद

क्रिया पालटे तात्काळ…(भाग – १)

नमस्कार मित्रांनो, मी अविनाश हळबे. आजपासून आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकणार आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ आज ऐकुया पहिला भाग.

कथा ऐकण्यासाठी क्लिक करा

क्रिया पालटे तात्काळ भाग १ कथा ऐका येथे..
‘अहो ऐकलं का हो’ – सौ ने हाक मारली.
‘काय हो – मी उत्तरलो.
‘अहो विनयभावजींची – तुमच्या जिवलग मित्राची – एकसष्ठी आहे येत्या पाच तारखेला. त्यांच्यासाठीच्या आहेराचं काही बघाल की नाही हो’ – सौ. म्हणाल्या.
‘अरेच्चा , विसरलोच की. बरी आठवण केलीस. बघतो मी काय द्यायचंं ते.’– मी.

विनयला एकसष्टीला काय द्यावे याचा विचार करता करता मला माझ्या आणि त्याच्या मैत्रीचा प्रवास आठवू लागला. मी आणि तो एकाच गल्लीत रहाणारे. अगदी बालपणचेे मित्र. विनय वर्गातला एक हुषार पण तितकाच आक्रमक आणि रागीट स्वभावाचा मुलगा. वर्गात त्याचा कायम पांचाच्या आत नंबर असे. अभ्यासाबरोबर वक्तॄत्वस्पर्धेतही तो बक्षिसे मिळवी. अर्थात या सर्व गोष्टींमुळे तो पुढेही सतत अव्वल क्रमांक मिळवत, मुंबईच्या आयआयटीतून बी. टेक् झाला आणि वडीलांच्याच फॅक्टरीत दाखल झाला. वयाबरोबर कर्तबगारीनेही तो मोठा झाला.

विनयच्या मानाने मी फारसा हुशार नव्हतो. हळव्या स्वभावाचाही होतो. मी एम ए झालो आणि एका महाविद्यालयात लागलो, अजून तिथेच आहे. माझी प्रगती तशी बरी होती. माझ्या आणि विनयच्या आर्थिक परिस्थितीत मोठा फरक असला तरी, आमची मैत्री अबाधित होती. यथावकाश आमची लग्ने झाली, संसार उभे राहिले, पण आमचे एकमेकांकडे येणेजाणे चालूच होते. माझे वडील फारच लहानपणी गेले असल्याने विनयच्या वडीलांचे माझ्यावर विशेषत्वाने लक्ष असे. अडीअडचणीचे वेळी मला ते आधारवडासारखे असत.

आमची मैत्री लहानपणापासूनची असली तरी त्यात एक गोम होती. मी लहानपणापासून कमालीचा श्रद्धाळू. रोजची पूजाअर्चा, ग्रंथवाचन, नामस्मरण हे माझ्या जीवनाचे अविभाज्य भाग होते. प्रयत्नवादी मीपण होतो, पण ज्या गोष्टी आपल्या कुवतीबाहेरच्या आहेत त्यासाठी ईश्वराची प्रार्थना करणे, अगदीच नार्इलाज झाला तर त्या  ईश्वरइच्छेवर सोडून देवन, येईल त्या प्रसंगांना तोंड देणे ही माझी भूमिका असे. विनयचा देवादिकांना विरोध नसे, पण त्यासाठी वेळखर्च करणे, प्रार्थना, अथवा आपल्या जीवनातल्या काही गोष्टी देवाच्या इच्छेवर सोडणेे, त्याला अजिबात पसंत नसे. लहानपणी आमचे यावर बरेच वाद होवन भांडणेही होत. पण आमची मैत्री अबाधितच होती. मोठे झाल्यावर आम्ही दोघांनी एक अलिखित नियम केला. तो माझ्या पारमार्थिक बाबीत ढवळाढवळकरत नसे आणि मीसुद्धा त्याला कुठे कथाकीर्तनाला नेण्याचा प्रयत्न करत नसे.

विनयच्या या विचारसरणीने हा एकसष्टीचा कार्यक्रम तरी त्यानेे कसा मान्य केला असा मला प्रश्र्न पडला होता. पण माझ्या पत्नीनेच तो खुलासा केला. पतीची एकसष्टी करण्याचे विनयच्या आईच्या मनात फार होते. पण त्याआधी जेमतेम सहा महिने राहिले असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे आपली राहिलेली इच्छा ती लेकाची एकसष्ठी करून पूर्ण करत असावी. आईच्या भावना जाणून विनयनेही होकार दिला असावा.

काय द्यावे विनयला हो मी विचार करू लागलो. विनयच्या घरांत सगळया वस्तू होत्या. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी नेहमीप्रमाणे देवपूजा करून दासबोध वाचायला बसलो. विनयला एखादी पोथी देण्याचा प्रश्र्नच नव्हता, त्याने ती घेतलीच नसती. अचानक मला वाटले .. विनयला श्रीमत दासबोध कां देवू नये हो दासबोध हा काही निव्वळपोथी वा धार्मिक ग्रंथ नव्हता, तर तो एक परिपूर्ण व्यवहारकोशही होता. तो विनयने नाकारण्याचे काहीच कारण नव्हते. बस्स ठरले. ऑफिसातून घरी येताना मी सार्थ दासबोध खरेदी करून छानपैकी गिफ्ट पॅकिंगही करून घेतले.

एकसष्टीच्या दिवशी आम्ही होमहवन वगैरे झाल्यावर त्यांना आहेर करू लागलो. हिने प्रियावहिनींना साडी दिली. मी विनयला माझी खास वस्तू देव लागलो.
‘अरे मी आहेर वगैरे नको असे म्हटले होते. मग हे कशाला हो’ विनय.
‘विनय हा आहेर नाहीे. जी भेट मी तुला देत आहे ती तुला पुढील आयुष्यभर उपयोगी पडेल. खरेतर मी आधीच द्यायला हवी होती. बट बेटर लेट दॅन नेव्हर.’– मी.
‘बापरे, मग तर ती घ्यायलाच हवी.’ विनय हसत म्हणाला.
जेवणे वगैरे उरकून आम्ही निघालो.

‘काय दिलेत तुम्ही भावजींना हो कोणती कादंबरी आहे हो’ – सौ. ने विचारले.
‘ कादंबरी वगैरे काही नाही गं, पण मी विनयला सार्थ दासबोध दिलाय ,’ – मी.
‘काऽऽऽऽय होहोहो अहो वेड बिड लागलेय का तुम्हाला हो भावजींचा स्वभाव कसा आहे माहीती आहे ना तुम्हाला हो’ सौने एकदम दचकून विचारले.
‘अगं येवढं ओरडायला काय झालं हो तो चिडेल एखाद्या वेळेस .. पण मी बघून घेईन काय ते.’ – मी.
‘नादिष्ट आहात. पण मला काही हे लक्षण ठीक दिसत नाहीये.’ सौ. ने समारोप केला.

तर मंडळी आज इथेच थांबुयात. 

ही कथा तुम्हाला आवडत असेल तर क्रमश: आपापल्या मित्रांना पाठावा. 

अविनाश हळबे, 
पुणे. 
मोबाईल नंबर – 9 0 1 1 0 6 8 4 7 2 

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

महान भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन

क्रिया पालटे तात्काळ…( भाग २)

क्रिया पालटे तात्काळ – भाग 4 था

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading