October 9, 2024
Mahadevgad Amboli Beautiful Place
Home » Privacy Policy » Photos : निसर्गसंपन्न आंबोलीतील महादेवगड…
पर्यटन

Photos : निसर्गसंपन्न आंबोलीतील महादेवगड…

एकामागोमाग येणारी घुमावदार वळणे अन् नागमोडी रस्ते, हिरवेगार डोंगर त्यावर पसरलेली धुक्याची चादर, डोंगरावरून अविश्रांत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि इथले आल्हाददायक वातावरण म्हणजे स्वर्गसुख.

दुर्गकन्या गिता खुळे

http://instagram.com/durg_kanya
दुर्गवारी,
डी सुभाष प्रोडक्शन

पश्चिम घाटातील जैवविविधतेचा दर्जा असलेलं आंबोली म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण. कोल्हापूर पासुन 120 किलोमीटरवर असणारे आंबोली, तिथलं हवामान तिथला पावसाळी निसर्ग म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच.

एकामागोमाग येणारी घुमावदार वळणे अन् नागमोडी रस्ते, हिरवेगार डोंगर त्यावर पसरलेली धुक्याची चादर, डोंगरावरून अविश्रांत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि इथले आल्हाददायक वातावरण म्हणजे स्वर्गसुख. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा घाटमार्ग असुन पावसाळयात तो पर्यटकांनी गजबजलेला दिसतो. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अनेक ठिकाणासोबत आंबोलीने ऐतिहासिक वारसा ही जपला आहे, तो म्हणजे महादेवगड.

आंबोली गावापासून ३ कि. मी. वर असणारा महादेवगड म्हणजे आंबोली भेटीतील खास ठिकाण. गडावर जाण्यासाठी डांबरी रस्ता असून गडाचा कातळ तिन्ही बाजूंनी तासून काढलेला आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ६४१ मीटर आहे. एकेकाळी गडाला तटबंदी, बुरुज आणि तटबंदी भोवती खंदक होते, पण सद्यस्थितीत गडावर दुर्दैवाने काहीच अवशेष शिल्लक नाही.

गडाच्या बांधणीचे श्रेय सावंतवाडी संस्थानाचे अण्णासाहेब फोंड सावंत यांना जाते. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेड्डी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाट मार्गाने घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जाई. यापैकी पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी गडाची बांधणी करण्यात आली. गडाच्या पश्चिम दिशेला मनोहर मन संतोषगड दिसताे.

गडाच्या टोकापर्यंत चालत जाऊन तिथला निसर्ग अनुभवता येतो. त्यामुळे इथे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कठडे बांधले आहेत. गडाच्या टोकाशी उभे राहिले असता धुक्यात हरवलेला सह्याद्री दिसतो. पावसाळा ओसरला की हिरवी दुलई पांघरलेल्या या गडावर पिवळया फुलांचा साज चढतो. त्यावेळी दिसणारा गड, इथला भन्नाट वारा आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातो..

महादेवगड आणि निसर्गसंपन्न आंबोली व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading