सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 2260 फुट उंचीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील रस्ते येथून जातात. जैवविविधतेने नटलेले हे ठिकाण पश्चिम घाटमाथ्यावरील सह्याद्रीच्या पर्वत रांगात मोडते.आंबोली गावातून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर महादेव गड किल्ला आहे. तेथून डोंगर दऱ्यांचे सौदर्य पाहण्यासारखे आहे. येथे दरवर्षी सरासरी 700 सेंटीमीटर पाऊस पडतो. धुके, पाऊस आणि थंड हवामानामुळे या परिसरात घनदाट जंगल पाहायला मिळते. आंबोली बस स्थानकापासून ११ किलोमीटरवर कावळेसाद पाॅईंट आहे. येथून दरी आणि पावसाळ्यात वाहणारे धबधबे पाहण्यासारखे आहेत. जवळपास सात धबधबे येथे आहेत. आंबोली गावापासून १८ किलोमीटरवरील बाबा धबधबा पाहण्यासारखा आहे. अशा या ठिकाणाचे ड्रोनच्या नजरेतून दर्शन डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने…
Amboli Water Fall कावळेसाद पाॅईंट Mahadev Gad Point Amobli Ghat Road