May 23, 2024
marathi Sahitya Parishad Baroda Literature competition
काय चाललयं अवतीभवती

बडोदे येथील मराठी वाङ्मय परिषदेचे साहित्य पुरस्कार जाहीर

बडोदे येथील मराठी वाङ्मय परिषदेच्यावतीने साहित्यावर आधारित विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच अखिल भारतीय स्तरावरील मराठीतील कथा, कविता, कादंबरी आदी विविध साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मिलींद बोडस व स्पर्धेचे संयोजक डॉ. धनंजय मुजुमदार यांनी दिली आहे.

स्पर्धांचे निकाल असे –

स्थानिक / अखिल भारतीय स्तरावरील मराठी साहित्य स्पर्धांचा निकाल असा-

पुस्तक परीक्षण स्पर्धा

१. सौ. मनिषा आवेकर, वडगाव – बुद्रुक, पुणे. ( ‘श्रेष्ठ भारतीय बालकथा’ )
२. ऋता ठाकूर, अहमदनगर ( ‘दोन मित्र ‘ जणू ओळखीच्या पाऊलखूणा)

कथासंग्रह

१. डॉ. मृणाल मराठे, सायन (पू) मुंबई (‘माणूस वाचताना ‘)
२. विद्या पेठे, विलेपार्ले (प) मुंबई (‘कथा – मनातल्या – जनातल्या’ )
३. रामदास खरे, ठाणे (प) (‘कॅमिस्ट्री’)

चरित्र

१. डॉ. चित्रलेखा पुरंदरे ( ‘राजमान्य राजश्री’) – उत्तेजनार्थ

विशेष बक्षिस

१. डॉ. सुरुची डबीर, नागपूर (‘संस्कृत महाकाव्यातील प्रतिमासृष्टी’)

काव्यसंग्रह

१. कॅप्टन वैभव दळवी – ठाणे (प), (‘निळाईची गाज ‘)
२. अनुराधा नेरुरकर – दहिसर (प) मुंबई (‘हुंकारनाद’)
३. सौ. प्रमोदिनी देशमुख, मालाड (प) मुंबई ( ‘सांगायचं राहून गेलं’)

कादंबरी

१. संतोष घसिंग, बीड (‘झामण झरा’)
२. योगिराज वाघमारे, जुने सोलापूर (‘किटाळ’)
३. कल्पना नरांजे, बहाद्दरा, ता. जि. नागपूर (‘मुक्ती’)

ललितलेख संग्रह

१. डॉ. क्षमा शेलार, बेल्हा, पुणे (‘धुमक्कडी’)
२. अरुण सावळेकर, पुणे (‘अंतर्वेद्य’)
३. डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, पुणे (‘थोरामोठ्यांच्या सहवासात’)

आत्मकथन

१. शीतल श्रीधर माडगूळकर, पुणे ( गदिमांच्या पंचवटीतून) – उत्तेजनार्थ

अभिरुची गौरव पुरस्कार

१. हर्षदा सुंठणकर, बेळगाव ( ‘कपडे वाळत घालणारी बाई’ – काव्यसंग्रह)
२. पोपट काळे, पुणे (‘काजवा ‘ – आत्मकथन )
३. ऋषिकेश आंबथे, गोरेगाव (प) मुंबई. ( ‘मन:पूर्वक’ – व्यक्तिचित्र )
४. प्रथम म्हात्रे – कोलगाव – भिवंडी-ठाणे ( ‘द प्लोटींग लाईफ इन मर्चन्ट नेव्ही’ – संकीर्ण )
५. आशिष गुप्ते लेटघर – महाड, रायगड ( ‘अंतरंगी अ वर्ग’ – कथासंग्रह)

स्थानिक पुरस्कार असे –

उत्सवांची परंपरा आणि त्यांचा इतिहास या साहित्यकृतीवरील धार्मिक निबंध स्पर्धेतील विजेते
१ प्रकाश सदाशिव आंबेगावकर, बडोदे
२. सौ. श्रद्धा गवांदे – बडोदे
३. मनिषा सोनार – बडोदे.

नवे तंत्रज्ञान आणि त्यातून उद्भवलेले नवे प्रश्न या विषयावरील विज्ञान विषयक निबंध स्पर्धेतील विजेते –
जयेश जनार्दन म्हाळगी – बडोदे (उत्तेजनार्थ)

काव्य स्पर्धा

२ सौ. वैशाली भागवत – बडोदा ( साहित्यकृती – ‘संगर’ )
३ सौ. सुषमा वडाळकर – बडोदा. (साहित्यकृती – ‘हिमवर्षा’ )

ललित लेख स्पर्धा

१ अश्विनीकुमार गंगाधर कुलकर्णी – बडोदा (साहित्यकृती – ‘दैव जाणिले कुणी ‘ )
२. सौ. सुचिता शिम्पी ( साहित्यकृती – ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ )

कथापूर्ती स्पर्धा

सौ. सुषमा वडाळकर – बडोदा ( साहित्यकृती – ‘आषाढी वारी…’ ) – उत्तेजनार्थ

अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांचे निकाल असे –

काव्य स्पर्धा

१ सौ. वैशाली भागवत – बडोदा ( ‘यज्ञ’)
२ प्रणाली देशमुख – अमरावती (‘निशाचर’)
२ सौ. अंजली मराठे – बडोदा ( ‘प्रवासी’)
३ आशिष चौबळ – पनवेल (‘सावळ’ )
३. डॉ. स्वाती मोरे- कांदिवली, मुंबई (‘मनःशांती’ )
४ सौ. संपदा देशपांडे – पनवेल (‘ते मौन बोलके होत ) – उत्तेजनार्थ

ललितलेख स्पर्धा

१. सौ. संपदा देशपांडे – पनवेल (‘सुसंवाद – काळाची गरज’)
२. सौ. श्रद्धा गवांदे – बडोदा (‘फोटो फ्रेम’)
३. सौ. जयश्री कापडिया – बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) (‘पहाटेच्या प्रहरी ‘)

कथा स्पर्धा

१. सौ. मनिषा आवेकर, पुणे ( ‘जीवलग सखी’)
२. सौ. वैशाली भागवत, बडोदा (‘सूर गवसला’)
३. सौ. वर्षा कीडे – कुलकर्णी, नागपूर (‘फ्लॉप शो ‘)

Related posts

आबालवृद्धांच्या मनाचा काठ चिंब करणारं ‘थुई थुई आभाळ’

शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या !

एका स्वातंत्र्यसैनिकाचा विवेकवाद !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406