मराठी साहित्य संमेलनासाठी नवोदितांना आवाहन
जळगाव – येत्या २, ३ आणि ४ फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून त्यामधील ‘कवी कट्टा’ उपक्रमांसाठी कवींकडून रचना मागवण्यात आल्या आहेत. गेली काही वर्ष साहित्य संमेलनात कवी कट्टा उपक्रम घेण्यात येतो असे उपक्रमाचे मुख्य संयोजक राजन लाखे यांनी सांगितले.
श्री. लाखे म्हणाले, दरवर्षी या उपक्रमास वाढता प्रतिसाद मिळतं आहे. याबाबत नुकतीच अंमळनेर येथे बैठक झाली त्यामध्ये उपक्रमाबाबत निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी राज्याच्या विविध भागातील कवींकडून कविता मागविण्यात आहेत आलेल्या रचनापैकी केवळ २०० रचनांची उपक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यवाह नरेंद्र निकुंभ होते तर व्यासपीठावर कविकट्टाचे प्रमुख संयोजक राजन लाखे (पुणे) मंडळाचे उपाध्यक्ष व कवीकट्टा समन्वयक रमेश पवार होते. या बैठकीस मराठी वाङमय मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, साहित्यिक प्रा.बी. एन. चौधरी, विलास पाटील, दिनेश नाईक, भाऊसाहेब देशमुख, रमेश धनगर, डॉ. कुणाल पवार, मनोहर नेरकर, शरद पाटील, सुनिता पाटील, प्रतिभा पाटील, विवेक जोशी, रत्नाकर पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय सोनवणे, रामकृष्ण पाटील, पुनम साळुंखे, आदी उपस्थित होते
पाठविण्यात येणारी रचना ही स्वरचित असावी तसेच रचना २० ओळींची असावी तसेच कवींनी एकच रचना पाठवायची आहे. रचनाच्या निवडीसाठी स्वतंत्र निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे. रचना पोस्टाने अथवा ई-मेल वर पाठवावी असे त्यांनी सांगितले. रचना युनिकोड फॉन्ट मध्ये असावी. येत्या २० डिसेंबरपर्यत रचना पाठविण्याची मुदत असणार आहे.
ई-मेल kavikatta97amalner@gmail.com अथवा पोस्टाने मराठी वाड्मय मंडळ नांदेडकर सभागृह न्युप्लाट अंमळनेर, जि. जळगाव ४२५४०१
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.