April 19, 2024
Call for submission of ghazals for ghazal katta in Marathi Sahitya Sammelan
Home » मराठी साहित्य संमेलनातील गझलकट्टासाठी गझल पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

मराठी साहित्य संमेलनातील गझलकट्टासाठी गझल पाठविण्याचे आवाहन

 गझलकट्टा निवेदन

अमळनेर, जि. जळगाव (महाराष्ट्र) येथे २, ३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गझलकट्टा या व्यासपीठावर गझल सादरीकरणासाठी स्वरचित गझल मागविण्यात येत आहे.

दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सर्वाधिक लोकप्रिय अशा गझलकट्टा व्यासपीठावर आपली दर्जेदार गझल पाठवावी. यासाठीचे नियम असे आहेत – गझल स्वरचित असावी व प्रत्येक गझलकारने एकच गझल पाठवावी. गझल सहा शेरांपेक्षा मोठी नसावी. गझल सादरीकरणासाठी तीन मिनिटांचा वेळ असणार आहे. गझल निवड समिती गझलची निवड करणार असून, निवड झाल्यास गझलकाराला ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. गझलकारने स्वत:चा पत्ता, दूरध्वनी क्रमांक व ई-मेल पानाच्या वरच्या बाजूस उजवीकडे स्पष्ट दिसेल असा लिहावा. गझलकारने ई-मेलने पाठवतांना युनिकोडमध्ये पाठवावी. गझल पोस्टाने पाठविल्यास टाईप करून पाठवावी. गझल पोस्टाने पाठवतांना पाकिटावर गझल असा स्पष्ट उल्लेख करावा. गझल ई-मेल अथवा पोस्टाने यापैकी एकावरच पाठवावी. दोन्हींकडे पाठविल्यास तसेच व्हॉट्सअपवर पाठविल्यास ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. निवड झालेल्या गझलकारांना सादरीकरणानंतर सन्मानाने प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. गझल स्वीकारण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२३ अशी आहे. गझल पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : amalnergazal@yahoo.com असा कप पोस्टाचा पत्ता : मराठी वाङ्मय मंडळ, नांदेडकर सभागृह, न्यू प्लॉट, अमळनेर – ४२५४०१ (जि. जळगाव) असा आहे.

Related posts

ओवी मोक्षपटाची…

आपली शिक्षणव्यवस्था फिनलँडच्या दिशेने नेता येईल का ?

निसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी

Leave a Comment