सोलापूर येथील निर्मला मठपती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अध्यक्षा शिवांजली स्वामी व सचिंव उत्तरेश्वर मठपती यांनी हे पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारांचे वितरण आठ आक्टोंबरला (रविवारी) दुपारी ०३.३० वाजता सोलापूर येथील डफरीन चौकातील आयएमए हॉलमध्ये होणार आहे.
पुरस्कारप्राप्त लेखक कवी व त्यांची पुस्तके:
कथासंग्रह विभागः
सीताराम सावंत, इटकी, सोलापूर (हरवलेल्या कथेच्या शोधात),
सर्वोत्तम सताळकर, गुलबर्गा (प्रतिशोध),
दीपक तांबोळी, जळगाव ( अशी माणसं अशा गोष्टी)
कविता संग्रहः
संजय चौधरी, नाशिक (आतल्या विस्तवाच्या कविता),
आबासाहेब पाटील, बेळगाव (घामाची ओल धरून)
डॉ. राजेंद्र शेंडगे, सोलापूर (वर्तुळाच्या आत-बाहेर अस्वस्थ मी),
डॉ. शिवाजी शिंदे, सोलापूर (अंतःस्थ हुंकार)
बाल कवितासंग्रहः
राजेंद्र उगले, नाशिक (थांब ना रे ढगोबा)
डॉ. श्रीकांत पाटील, घुणकी जिल्हा – कोल्हापूर, (झाडोरा )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.