May 22, 2024
Paddy plantation programm by FC Student
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे ‘एक दिवस बळीराजासाठी

‘अमृतवर्षा’ हा उपक्रम बळीराजाशी जोडलं जाण्याचा एक प्रयत्न होता. शेतातून धान्य पिकवण्यासाठी नेमके काय काय कष्ट करावे लागतात, एकंदरीत शेतीची प्रक्रिया काय असते या सगळ्या गोष्टी समजून घेणं हा या उपक्रमाचा उद्देश होता.

पुणे – फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे च्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बुधवार, 20 जुलै रोजी ‘अमृतवर्षा’ (एक दिवस बळीराजासाठी) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत आपला ‘एक दिवस अन्नदात्यासाठी’ दिला. या उपक्रमाचा उद्देश प्रामुख्याने विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार व्हावेत आणि नवीन पिढीला शेतकर्यांच्या कष्टांची जाणीव व्हावी, शेतकरी हा ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या शेतामध्ये कष्ट करतो आणि भाताचे उत्पादन घेतो विद्यार्थ्यांना भात लावणीच्या प्रत्यक्ष अनुभव यावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यातील ‘शिवे’ या गावाला भेट देऊन स्वयंसेवकांनी तेथील शेतकऱ्यांसोबत भातशेतीतील विविध कामं प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेतली.

‘अमृतवर्षा’ हा उपक्रम बळीराजाशी जोडलं जाण्याचा एक प्रयत्न होता. शेतातून धान्य पिकवण्यासाठी नेमके काय काय कष्ट करावे लागतात, एकंदरीत शेतीची प्रक्रिया काय असते या सगळ्या गोष्टी समजून घेणं हा या उपक्रमाचा उद्देश होता. तसेच स्वयंसेवकांना शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून ते करत असणारी कामं, त्यांच्या समस्या या सगळ्याबद्दलही जाणून घेण्याची संधी मिळाली. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकलेलं हे अन्न आपण वाया घालवत असू तर ते थांबवायला हवं याची जाणीवही या उपक्रमाच्या माध्यमातून झाली.

हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये शिवे गावातील ग्रामपंचायत सदस्य विनायकजी शिवेकर तसेच माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले स्वयंसेवकांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यापासून त्यांच्या नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था बघण्यातही गावकऱ्यांचा सहभाग होता. स्वयंसेवकांचे अनुभव ऐकल्यावर ‘अमृतवर्षा’ या उपक्रमाची उद्दिष्टं सफल झाल्याची भावना कार्यक्रम अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामध्ये 45 स्वयंसेवकांसोबतच तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष फरांदे, प्रा. शिवाजी कोकाटे आणि डॉ. सोनालिका पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी, कला विभागाचे शैक्षणिक समन्वयक डॉ. आनंद काटीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related posts

माहेर हे हक्काचे प्रेमाचे घर

आत्मज्ञानामुळेच जनतेला योग्य न्याय

राखाडी रंगाच्या पाटीचा राखी वटवट्या…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406