मुंबई – ‘फ्रेंड्स ऑफ कोकोनट ट्री (FOCT) पाम क्लाइम्बर्स’ म्हणजेच ताडामाडावर चढणाऱ्या लोकांना ‘पाडल्या’ असे म्हणतात. नारळांच्या उंच झाडावर चढून फळे पाडण्याचं काम कुशलतेने करणाऱ्या लोकांसाठी नारळ विकास मंडळ कोची येथील मुख्यालयात कॉल सेंटर स्थापन करण्याची योजना आखली जात आहे. कॉल सेंटर FoCTs च्या कृती दलाद्वारे झाडांचे संरक्षण, काढणी आणि इतर लागवड प्रक्रियेत नारळ उत्पादकांच्या गरजा पूर्ण करेल.
ताडामाडावर चढणाऱ्या ‘ताडमाड स्नेहींना’ या क्षेत्राशी संबंधित फायदे मिळवण्यासाठी लवकरात लवकर कृती दलात सामील होण्याची विनंती करण्यात येत आहे. कॉल सेंटरद्वारे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नारळ क्षेत्रामध्ये विविध कामांसाठी FoCTs च्या कृती दलाचा सहभाग असेल.
अधिक माहितीसाठी कृपया कोचीच्या नारळ विकास मंडळाच्या प्रसिद्धी विभागाशी संपर्क साधावा.
ईमेल आयडी: cdbpub[at]gmail[dot]com,
दूरध्वनी: 0484–2376265 (विस्तार: 137) /8848061240