June 18, 2024
Damasa Marathi Literature award 2022
Home » दमसाचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

दमसाचे साहित्य पुरस्कार जाहीर

वसंत गायकवाड, सीताराम सावंत, आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२२ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी वसंत गायकवाड, सीताराम सावंत, आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. २५ मे २०२३रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी –

१. देवदत्त पाटील पुरस्कार: वसंत गायकवाड – तथागत गौतम बुद्ध, (कादंबरी ),
२. शंकर खंडू पाटील पुरस्कार: जयवंत आवटे – बारा गावचं संचित (कथासंग्रह),
३. अण्णा भाऊ साठे पुरस्कार: सीताराम सावंत – हरवलेल्या कथेच्या शोधात
४. कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार: –विनायक होगाडे – डिअर तुकोबा ( संकीर्ण) ,
५ . शैला सायनाकर पुरस्कार: आबासाहेब पाटील – घामाची ओल धरून (कवितासंग्रह),
६ .चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) – सगळेच ऋतू दगाबाज – कविता ननवरे (कवितासंग्रह ) आणि
७. बालवाड्मय पुरस्कार – गांडूळाशी मैत्री – वंदना हुळबत्ते

विशेष पुरस्कार :

१. संत गाडगेबाबा समग्र ग्रंथ – रा. तु. भगत ,
२. राजर्षी शाहू आणि भटके विमुक्त – व्यंकाप्पा भोसले
३. जीवनरंग – अच्युत माने
४. पाषाणपालवी – बी. एम. हिर्डेकर
५. लढवया – सुभाष ढगे पाटील
६.ऑनलाईन शिक्षण पद्धती – गणपती कमळकर,
७. सत्य असत्याशी मन केले ग्वाही – प्रशांत गायकवाड,
८.रे आभाळा – रामकली पावसकर,
९. आदिवासी कवितेचा परामर्श – गौतम जाधव,
१०. संचित – प्रकाश काशीद
११. आवडलं ते निवडलं – अभिजीत पाटील
१२. थेंबातला समुद्र – वैष्णवी अंदुरकर
१३. बाभूळमाया – विकास गुजर
१४. कोल्हापूरचे महापौर – गुरुबाळ माळी/आप्पासाहेब माळी/सतीश घाटगे
१५. सुलवान – मेघा रमेश पाटील
१६. वर्तुळाच्या आतबाहेर अस्वस्थ मी – राजेंद्र शेंडगे
१७. कपडे वाळत घालणारी बाई – हर्षदा सुंठणकर
१८. ऐहिकाच्या मृगजळात – पूजा भडांगे
१९. शाळा सुटली – प्रणिता शिपुरकर
२०. पकाल्या – खंडेराव शिंदे
२१. चैत्रायन-शैलजा टिळे- मिरजकर
२२. वंचितांचे अंतरंग- अशोक बापू पवार
२३. गझल साया – सिराज शिकलगार

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०२२ या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. गोपाळ गावडे, सुनील इनामदार, गौरी भोगले यांनी काम पाहिले.

पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी (ता. २५ मे) रोजी सकाळी साडे दहा वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी सांगितले आहे.

Related posts

शिवराज्योदय तोरणापूर्वीच…!

चेहरा हरवलेल्या लेकी…

शेटफळ येथील सिद्धेश्वराची यात्रा…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406