मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रा. आदिनाथ यशवंतराव पवार यांनी दिली.
राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी २०२१ व २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाच्या दोन प्रती लेखकांनी १५ जून २०२३ पर्यंत पाठवाव्यात. कथा, कादंबरी, काव्यसंग्रह, लेखसंग्रह करिता छत्रपती राजे संभाजी साहित्य पुरस्कार आणि समीक्षा ,संपादित, प्रवास व बाल साहित्यासाठी महात्मा फुले साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप राहील.
सप्टेंबर २०२३ मध्ये ग्रंथ पुरस्कार जाहीर होतील. ऑक्टोबर २०२३ मध्ये पुरस्काराचे वितरण होईल. असेही श्री पवार यांनी सांगितले. पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचा पत्ता असा- प्रा आदिनाथ यशवंतराव पवार, अध्यक्ष – मराठी साहित्य प्रतिष्ठान, बस स्टँड समोर, जामखेड. जि. अहमदनगर ४१३२०१ मोबा.9657325611
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.