August 8, 2022
Pooja Diwan Poem Var Amrut Swapnancha
Home » वर अमृत स्वप्नांचा..
कविता

वर अमृत स्वप्नांचा..

वर अमृत स्वप्नांचा

सुख वाटता वाटता
पडो आभाळही थिटे
दुःख वाटण्या पहाता
हात हळू मागे तटे

दुःख ऐकण्या सदाच
श्रुती असावी तत्पर
दुःख कथिण्या कधीच
ओठी पडो न अंतर

दुःख ऐकता ऐकता
चिंब पापणी भिजावी
सुख ऐकता ऐकता
ओठी शीळ उमटावी

साद सुखात दुःखाची
कुणी कधी ना ऐकली
आस दुःखात सुखाची
कुणा कधी ना सुटली

असा फेर हा दैवाचा
मध्ये खांब मनुजाचा
मर्त्य तनुज मनूला
वर अमृत स्वप्नांचा

कवयित्री – पूजा दिवाण

Related posts

चावट भुंगा

बा.. निसर्गा….

समई मानवतेची…

Leave a Comment