🌳 कृषिसमर्पण 🌳
👁 फवारणी करताना अशी घ्या डोळ्यांची काळजी 👁
सतत उन्हात, सुर्याच्या अतिनिल किरणांमध्ये काम केल्यामुळे डोळ्यांच्या विविध व्याधींचा त्रास शेतकर्यांना होतो जसे, डोळा कोरडा पडणे, डोळ्यावर साय तयार होणे, लवकर मोतिबिंदूची लागण होते, शेतातील विविध गवत, किडे, धुळ आदिंची ऍलर्जी होणे, शेती कामात वापरल्या जाणार्या केमिकलची ऍलर्जी होणे, डोळ्याला मार लागणे आदी आणि या सर्व धोक्यामुळे त्यांना अंशत: किंवा पुर्णत: अंधत्व येण्याची शक्यता असते जर वेळीच काळजी घेतली नाही तर शिवाय पैसा जातो तो वेगळाच.
शेतकरी मित्रहो, आज आपण शेतात केमिकल फवारणी (तणनाशक, किटनाशक इ.) फवारतांना कोणकोणती काळजी घ्यायची त्याविषयी माहिती घेवू.
शेतात योग्य प्रतीचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी बंधू विविध केमिकल वापरतो. हेच केमिकल शेतकरी शेतात, झांडावर फवारतांना मुख्यत: ३ प्रकारे धोका निर्माण करू शकते जसे…
- केमिकलचे बारीक बारीक कण हवेबरोबर श्वाच्छोस्वासासोबत शरीरात.
- फवारणी करत असतांना वा तयारी करत असतांना ‘त्वचेच्या संपर्कामधून’
- अंशत: धोका हा नकळत ‘तोंडाद्वारे पोहत गेल्याने’ जसे फवारणी करतांना खातांना, बीडी पीतांना इ. ‘डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायर्नमेंट आणि प्रायमरी इर्ंडाइस’ ऊएझख च्या मार्गदर्शक तत्वानुसार शेतकरी मित्रांनी फवारणी करतांना.
काय करावे..?
१) सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो शासनाने प्रमाणित केलेलेच केमिकल फवारणीसाठी स्विकारावे व त्याविषयीची मिळालेली संपुर्ण माहिती पुर्णत: वाचावी.
२) फवारणी केमिकलची पुर्व तयारी करतांना संपुर्ण शरीर हे ‘ऍपरने झाकावे/घालावे’ डोळ्यावर गॉगल तर पायात मोठे गम बुट घालावेत. हातात गोल्व्हज् घालावे. संपुर्ण चेहरा कापडाने वा हेल्मेटने झाकावा.
३) फवारणीची तयारी करतांना शरीराच्या कुठल्याही भागाला संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी .
४) फवारणी यंत्र, त्याचे नोझल उत्तम प्रकारे काम करत आहे याची तपासणी करून घ्यावी.
५) फवारणी करतांना हवा जर पूर्व-पश्चिम वाहत असेल तर फवारणी सुध्दा त्याच दिशेने करावी.
६) फवारणी करतांना फवारणी जमीनीलगत करावी.
७) फवारणीच्या वेळेस इतर जास्तीचे लोकास बाजूला सारावे.
८) फवारणी झाल्यावर हात-पाय स्वच्छ पाण्याने, साबणाने संपुर्ण धुवावेत नंतरच इतर कामे करावे.
९) फवारणी केलेल्या केमिकलची संपुर्ण माहिती, तारीख, एक्सपायरी आदिंची संपुर्ण माहिती लेखी ठेवावी.
१०) फवारणीच्या वेळेस प्रथमोपचार पेटी जवळपासच ठेवावी.
११) फवारणी झाल्यावर केमिकलचे पाकीट/डबा संपुर्ण खाली करून तीनवेळा पाण्यातून काढल्यावर ते पाकिट/डबा परत दुकानदाराला किंवा प्रामाणिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठवावा.
१२) शेतात फवारणी करतांना शेतकर्यास फवारणीची लागण झाल्यास लगेच डॉक्टरांकडे न्यावे.
काय करू नये…
१) हवेची गती जेव्हा तीन किमी/तास पेक्षा कमी किंवा १५ किमी/तास पेक्षा जास्त असेल तेव्हा फवारणी करू नये. (हवेची गती ही हवामान खात्याकडून, ऍनोमीटर स्मोक जनरेटर आदिची माहिती मिळेल)
२) जेव्हा हवेची दिशा ही केमिकल शाळेच्या दिशेने किंवा पाण्याच्या दिशेने (नदी, तलाव), रहीवास, गुरांचे पाग आदींच्या दिशेने असेल तेव्हा फवारणी करून नये.
३) पावसात, धुक्यात फवारणी करू नये.
४) फवारणी करतांना खाणे पिणे आदी टाळावे.
५) फवारणीच्या वेळेस लहान मुलांना जवळ ठेवू नये.
६) ज्या केमिकलच्या फवारणीमुळे पिकाला धोका होईल त्या दिशेला फवारणी करू नये.
७) फवारणी झाल्यावर यंत्र साफ झाल्यावर पाणी हे पाण्याच्या स्त्रोतापासून संपर्कापासून दूर सारावे, तसेच प्राण्यांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.
ही मार्गदर्शक तत्वे पाळल्यास नक्कीच फायदा होईल. फवारणी करतांना केमिकल डोळ्यात गेल्यास पुढीलप्रमाणे लक्षणे दिसतात.
- डोळे लाल होणे.
- डोळ्याची पापणी जड होणे.
- डोळ्यातून भरपूर पाणी येणे.
- भुरकट दिसायला लागणे.
- प्रकाशाकडे पाहता न येणे.
अशा वेळेस थोडा वेळ न घालविता डोळा लगेच स्वच्छ पाण्याने किमान १५ मिनीटे धुवावे. डोळा चोळू नये त्याऐवजी थंड पाण्याने थोडा चोळावा. आणि लवकरात लवकर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखविणे. घरच्या घरी डोळ्यात तेल, मध, गाईचे दूर घालण्याच्या मोह टाळावे. डॉक्टरांकडे जातांना केमिकलची माहिती पुस्तिका न विसरता घेवून जाणे.
|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||
( सौजन्य – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य )