April 19, 2024
shripad-bhalchandra-joshi-poem-on-mahatma-gandhi
Home » एक चष्मा एक दृष्टी
कविता

एक चष्मा एक दृष्टी

एक चष्मा एक दृष्टी
दोन पावले अजून चालती
एक काठी फक्त गाठी
न उगारता आधारासाठी

घेत पोटाशी जगभरचा द्वेष
अजूनही फिरतो देश,
देश आग विझवतो
नजरेने प्रेमाच्याच

पुनः पुन्हा तोच
ठरवताहेत विखारी जगभर
गुन्हा मोडून झाला तोडून झाला
मारून झाला मरून झाला

चष्मा त्याचा पळवून झाला
मिटवून झाल्या स्मृती तरी
त्याच्याच जगभर कशा
गातात श्रृती

कळायला असावे लागते
फक्त एक मोकळे हृदय ए
क मोकळा श्वास सोडून
वृत्ती ज्याचा त्याचा घेण्याचा घास

महात्म्याकडे बघून माणसा
फक्त एकदा प्रसन्न हास

कवी – श्रीपाद भालचंद्र जोशी

Related posts

स्वराज्य उभे राहाते तरी कसे ?

कलिंगड खाण्याचे फायदे

Saloni Art : ओरीगामी चांदणी…

Leave a Comment