July 27, 2024
Pushapa Varkhedkar article on Dr Panjabrao Deshmukh
Home » लोकमहर्षी युगपथदर्शी डॉ. पंजाबराव देशमुख
सत्ता संघर्ष

लोकमहर्षी युगपथदर्शी डॉ. पंजाबराव देशमुख

महामानव डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्य स्मृतीप्रित्यर्थ

शिक्षण महर्षी कृषी क्रांतीचे प्रणेते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी अभिवादन .आज १० एप्रिल त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने…

सौ पुष्पा सुनिलराव वरखेडकर
माजी पर्यवेक्षिका पी डी कंन्या शाळा वरूड

भगीरथ प्रयत्न करून ज्ञानाची गंगा दारोदारी नेणारे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव करणे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ मध्ये आई राधाबाई वडील शामराव बापू यांच्या पोटी पापड या गावी झाला. त्यांचे सौंदर्य मोहून टाकणारे होते. १९०६ मध्ये पंजाबराव चे नाव शाळेत टाकण्यात आले. पंजाबराव लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. नियमितपणा, आज्ञाधारकपणा म्हणून निग्रह त्यांच्या स्वभावात रुजू झाले. त्यांना मुळातच रेखीव पोषाखाची, निट नेटकेपणाची आवड होती.

शैक्षणिक प्रवास

१९०६ मध्ये पंजाबराव शामराव कदम या नावाने शाळेत नोंद करण्यात आली. वर्ग पाच ते आठ कारंजा इथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. अमरावती येथे हायस्कूलचे शिक्षण झाले. १९१८ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. १८१८ मध्ये २५ जूनला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अलाहाबाद येथे विश्वविद्यालयाच्या परीक्षेत त्यांनी प्राविण्य मिळविले. मध्यप्रदेश सरकारने चौदा रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली. पुढील शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. पुढील शिक्षणाकरिता इंग्लंड च्या “एडीनबर्ग” विश्वविद्यालयामध्ये एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. १९९३ मध्ये ते संस्कृत विषय घेऊन एम.ऐ.ऑनर्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. वयाच्या केवळ २७ व्या वर्षी वैदिक वाड्मयात अध्यासन करून वैदिक वाड्मयात “धर्माचा उद्गम आणि विकास” हा प्रबंध लिहून ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाची D.Fil. महापंडित ही पदवी मिळविली. शेवटची बॅरिस्टरी पास करून मायदेशी परत आले. शिक्षणाची ज्ञानाची तपस्या पूर्ण करून मायदेशी परतले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे .ते पिल्यावर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे शिक्षण विषयक विचार सामान्य माणसाच्या सर्वांगीण क्रांतीची गुरुकिल्ली म्हणजे शिक्षण असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षण घेऊन ऐषोआरामात जगणे त्यांचे ध्येय नव्हते.

तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी केली शिक्षणाची द्वारे खुले

असतो मा सद्ग गमय
तमसो मा ज्योतिर्गमय !
ही सर्व शक्ती एका शिक्षणामध्ये आहे .म्हणून त्यांनी तळागाळातील शेतकरी शेतमजूर वंचित व दलित समाजातील मुला-मुलींना शिक्षणाची द्वारे खुले करून देण्याकरिता जीवाचे रान केले. तसेच घर, शेती गहाण ठेवून दिली. असे म्हणावे लागेल.

“की इंधनापरि तो जळला!
चंदनापरी तो झिजला!
ज्ञानाची टाके ठिणगी
अग्नी अजूनही न विझला!
भाऊ साहेबांनी आपल्या दूरदर्शीपणाने शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीची स्थापना केली. त्यांनी महात्मा फुले च्या शिक्षण विषयक विचार सूत्राचा मतितार्थ डॉक्टर भाऊ साहेबांनी जाणला. व त्यांनी शिक्षण विचार कार्याला वाहून नेले. शिक्षणाचा वटवृक्ष सामान्य जनतेसाठी लावला .त्याच्या अनेक शाखा व त्याचे जाळे दूरवर पसरले आहे. शिवरायाची स्मृती ही मराठी जनतेची अमर स्फूर्ती गाथा बनलेली आहे. युगाकर्त्या पुरुषाची आठवण समाजाला राहावी म्हणून आपल्या संस्थेला शिवाजी शिक्षण संस्था हे नाव दिले आहे.१ जुलै १९२५ हा दिवस अमरावती जिल्ह्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा व सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस ठरला. विद्यालयात पदवीधर तरुणांचा तुटवडा असल्यामुळे M.A. Onars Dfil,Bar- at -Law असा महामानव शिक्षक म्हणून विनावेतन काम करणारा लाभला. ज्ञानाचा उपयोग मराठी पिढीतील तरुणांना शिक्षणाविषयी प्रेम निर्माण करण्यात त्यांनी केली.

त्यांनी श्रद्धानंद बोर्डीग स्थापना केली .समाजातील मांग, चांभार ,मुसलमान अस्पृश्य असे विद्यार्थी त्यांनी बोर्डिंग मध्ये जमा केले. नुसते लिहिणे, वाचणे म्हणजे शिक्षण नव्हे शिकण्यासोबतच विद्यार्थी खेळले पाहिजेत. सुदृढ बनले पाहिजेत आणि व्यायाम केला पाहिजे व बलशाली समाज निर्माण झाला पाहिजे. ही कल्पना डॉक्टर पंजाबराव साहेबांची होती.

भारतीय कृषक आणि कृषी यावर प्रेम करणारा हा भूमिपुत्र दुसरा कोणी नसून ते डॉक्टर पंजाबराव देशमुख होते. नंतर पंजाबराव देशमुख यांची नागपूरच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून निवड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाविषयी ते नेहमी जागृत असत. मंत्रिमंडळात असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले. शेतकरी हा कर्जबाजारी होत होता. मुला मुलींचे शिक्षण लग्न व घर प्रपंच चालविणे त्याला दुरापास्त होत होते. त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा हा लोक पुढारी म्हणजे डॉ पंजाबराव देशमुख.

इस कंकर पत्थर को भी तुमने नवनेतृत्व सिखाया!
कृषी विद्यापीठ उसने लाकर हमको आज दिखाया!
सब दिन किसान अच्छुत अपढकी तुम थे सुदृढ नौका,,!
लो प्रणाम कोटी जनो का
लो प्रणाम कोटी जनोका
असा हा लोकमहर्षी, युगपथदर्शी, शिक्षण महर्षी कृषी क्रांतीचा प्रणेता. या महामानवास आजच्या पुण्यस्मरणदिनी कोटी कोटी प्रणाम..🌹🌹


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

१८ नोव्हेंबरपासून मोशी येथे दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन

कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

उडदाचे दर कमी होण्यास सुरुवात, पावसामुळे खरिपाच्या लागवड क्षेत्रात वाढ

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading