February 29, 2024
Sandesh Bhadare Comment on Wari And Tamasha
Home » वारी आणि तमाशातून सामान्यांचे जीवन टिपले – संदेश भंडारे
काय चाललयं अवतीभवती

वारी आणि तमाशातून सामान्यांचे जीवन टिपले – संदेश भंडारे

नागपूर : छायाचित्रकार प्रसिद्ध व्यक्तींना नेहमी टिपत असतात, मात्र सर्वसामान्यांचे जीवन तितक्या क्षमतेने टिपले जात नाही. म्हणूनच मी महाराष्ट्रातील दोन लोकपरंपरा वारी आणि तमाशा यांच्या माध्यमातून सामान्यांचे जीवन टिपण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी केले.

विदर्भ साहित्य संघाच्यावतीने भंडारे यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विदर्भ साहित्य संकुलातील अमेय दालनात लेखक समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे आणि कवी प्रफुल शिल्लेदार यांनी संदेश भंडारे यांची मुलाखत घेतली. यावेळी भंडारे म्हणाले, प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांच्या छायाचित्रातून प्रेरणा घेत छायाचित्र विश्वात प्रवेश केला. छायाचित्र काढताना विचारांची परंपरा चोवीस तास सुरू राहते. वारी आणि तमाशाने मराठी माणसाचा उदारमतवादी विचार जगासमोर आणला. तमाशात बहुतांश भटके आणि दलित समाजातील कलाकार असतात. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही योग्य नाही. तमाशाच्या माध्यमातून ते अभिव्यक्त होतात आणि मनोरंजनासोबतच समाजाचे प्रबोधनही करतात. सिनेमाने तमाशा कलेचे शोषण केले आहे. सिनेमात तमाशाचे चुकीचे वर्णन केल्याने समाजात तमाशाबाबत गैरसमज प्रस्थापित झाले, असेही भंडारे म्हणाले.

Related posts

मानवतेच्या मूळ भूमीतून उफाळलेला लाव्हा ” अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त “

डॉ अनिंदा मुझूमदार यांना सागरी शास्त्रासाठी राष्ट्रीय पुरस्कार

एककांचे मानकरी…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More