April 14, 2024
Sant Namdev National award to Navtej Sarna
Home » नवतेज सरना यांना  यंदाचा ‘सरहद’चा‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’
काय चाललयं अवतीभवती

नवतेज सरना यांना  यंदाचा ‘सरहद’चा‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’

  • भारताचे अमेरिकेतील पूर्व राजदूत नवतेज सरना यांना  यंदाचा ‘सरहद’चा ‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’ 10 जुलै 2023 रोजी पुण्यात देणार.

पुणे : सरहद संस्थेतर्फे 1993 साली सुरू झालेला संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार यंदा भारताचे अमेरिकेतील पूर्व राजदूत नवतेज सरना यांना दि. 10 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता थ्री डेस्टिनेशन, लोटस बँक्वेट मुकुंदनगर, पुणे 37 येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते देण्यात येणार आहे.

या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून दैनिक सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार तर अतिथी म्हणून विद्याधर बाळासाहेब अनासकर तसेच रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत.  ही माहिती सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि पुरस्कार समितीचे अध्यक्ष संतसिंग मोखा यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.

एक लाख, एक हजार रूपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते दृढ करणार्‍या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कतृत्व गाजवलेल्या केवळ पंजाबी व्यक्तीस प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

यापूर्वी पंजाब केसरी वृत्तपत्र समुहाचे विजयकुमार चोपडा, चित्रपट निर्माते यश चोपडा, एस.एस.विर्क, सत्यपाल डांग, के. पी. एस. गिल, कवी गुलजार, माँटेकसिंग अहलुवालीया, प्रकाशसिंग बादल, एन. एन. व्होरा, सतपाल मलिक, ए.एस. दुल्लत,  आदिंना हा पुरस्कार देण्यात आला असून यंदाचा 2023 चा 18 वा संत नामदेव पुरस्कार देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान करणारे भारताचे अमेरिकेतील पूर्व राजदूत तसेच यु. के. मधील माजी उच्चायुक्त, इस्त्राईल मधील भारताचे राजदूत आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते, शीख इतिहासाचे लेखक नवतेज सरना यांना देण्यात येणार आहे.

यापूर्वी माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार, हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, राज ठाकरे,  आर. आर. पाटील , केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे.

Related posts

अक्कल काढा (ओळख औषधी वनस्पतीची)

दुष्टांच्यातील दुष्टत्व संपवणे हेच अध्यात्म

आयुष्य कशासाठी मिळाले ?

Leave a Comment