तुझं नि माझं नातं असं असावं
प्रेम दुनियेतील गजबजलेलं गाव असावं
तुझं नि माझं नातं अस असावं
अबोलीच्या फुलासारखं अबोल
परी न बोलताच मनातल्या भावना समजणारं
तुझं नि माझं नातं अस असावं
गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुललेलं
काठ्यातून उमलून एकमेकांना आधार देणारं
तुझं नि माझं नातं अस असावं
प्राजक्ताच्या फुलांचा सडा होऊन पसरलेलं
जीवनाच्या वाटेवर आनंदाचा
झरा होऊन बसलेलं
तुझं नि माझं नातं अस असावं
गुलमोहरासारखं खुललेलं
अंधारात रातराणीच्या सुगंधाने उधळलेल
तुझं नि माझं नातं अस असावं
निशिगंधासारखं मोहरलेलं
चाफ्यासारखं धुंद होऊन बहरलेलं
तुझं नि माझं नातं अस असावं
मोगऱ्याच्या फुलासारखं आनंद
देऊन ओंजळीत सदैव हसतं राहणारं
तुझं नि माझं नातं अस असावं
मनाच्या मयुराच्या पिसासारखं पसरलेलं
भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा होऊन दरवळणारं
कवयित्री – शितल पोतदार, वडूज, सातारा
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.