२४ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
चंद्रपूर: पुणे येथील भोसरीमधील नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील कवी कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही २४ वी राज्यस्तरीय स्पर्धा असून विनामुल्य व सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
कवींनी श्रावण व निसर्ग या विषयावरील आपल्या स्वरचित कवितेच्या दोन रचना पाठवाव्या. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कवी कवयित्रींना सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल ही होणार आहे. कविता पाठविण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२३ आहे. तरी जास्तीत जास्त कवींनी यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
कविता पाठविण्याचा पत्ता – प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे, राष्टीय अध्यक्ष – नक्षत्राचं देणं काव्यमंच, साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाईटस, भोसरी, पुणे – ४११०३९ या पत्यावर पोष्टाने पाठवाव्यात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.