July 27, 2024
Sudhakar Naik Memory article by Yadikar Panjab chavan
Home » जलनायक – सुधाकरराव नाईक
सत्ता संघर्ष

जलनायक – सुधाकरराव नाईक

आज 10 मे सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिन. बघता सुधाकरभाऊनां जावुन 21 वर्षे झाली. त्यांच्यानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. सुधाकरभाऊ हे त्या अर्थाने बंजारा समाजाचे शेवटचे नेते होते. नेत्याला आवश्यक असलेले दुरदुष्टीचे सगळे गुणधर्म सुधाकरभाऊच्या ठायी ठासुन भरलेले होते.

याडीकार पंजाब चव्हाण

श्रीरामपूर, ता. पुसद जि. यवतमाळ
मोबाईल नंबर 9552302797

आज 10 मे सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिन.ब बघता सुधाकरभाऊनां जावुन 21 वर्षे झाली. सुधाकरराव नाईक यांच्यानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. बंजारा समाजाला नेता आहे. परंतु समाजात नेता असणे यात फरक आहे. मनोहरभाऊ नाईक, हरिभाऊ राठोड, मखराम पवार, संजय भाऊ राठोड, निलयभाऊ नाईक, प्रदीप नाईक, इंद्रनील नाईक, राजेश राठोड, डॉ. तुषार राठोड, राजु नाईक आजही नेतेमंडळी आहेत. परंतु सुधाकरभाऊ सारखी दुरदुष्टी जोपासणारी व्यक्ती मिळणे दुरापास्त आहे.

वसंतराव नाईक यांच्यामुळे राजकारणात

सुधाकरभाऊ हे त्या अर्थाने बंजारा समाजाचे शेवटचे नेते होते. नेत्याला आवश्यक असलेले दुरदुष्टीचे सगळे गुणधर्म सुधाकरभाऊच्या ठायी ठासुन भरलेले होते. राजकारणात सरंपच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष ते मुख्यमंत्री, राज्यपाल अशी मजल मारणारे सुधाकरभाऊ यांच्यात हा परिपक्वपणा, संस्कारातून, अनुभवातून, आणि महानायक वसंतराव नाईक यांच्या मार्गदर्शनातून आला होता. एका भटक्या विमुक्त जातीतील माणुस अख्या महाराष्टाचे नेतृत्व करु शकतो हे सुधाकरभाऊंनी दाखवून दिले. सत्ता गेल्यानंतरही ज्याप्रमाणे महानायक वसंतराव नाईक लोकांच्या अडीअडचणी आणि सुख-दु:खात धाऊन जात अगदी त्याचप्रमाणे सत्तेतून घरी परतल्यांनंतर ही सुधाकरराव नाईक आपल्या मतदार संघात आणि जनतेच्या सतत संपर्कात राहीले होते. हा नाईक घराण्याचा विशेष गुण आहे. त्यामुळेच लोंकाची नाळ नाईक घराण्याशी जुडलेली आहे. सुधाकरभाऊचे राजकारणात आगमन वसंतराव नाईक यांच्यामुळे झाले. त्यांनी जन्मभर वकिली केली असती, तर सुधाकरभाऊ कदाचित राजकारणात आले नसते.

महाराष्ट्रात जलक्रांतीसाठी प्रयत्न

सुधाकरभाऊ राजकारणात आल्यानंतर त्यांचा रूबाबदारपणा, त्यांच्यातील कुशल प्रशासकपणाचा आणि निश्चयाचा प्रत्यय वारंवार येत गेला. माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना केंद्रात संरक्षणमंत्रीपद मिळाले त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ सुधाकरराव नाईक यांनी घेतली. महाराष्ट्रात जलक्रांतीसाठी नाईक यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती करून संपूर्ण राज्यात पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश दिला. त्यांच्या या कार्यक्रमाला सॅल्यूट केला पाहिजे.

राज्यात काँग्रेसपक्षास बळकटी

मुख्यमंत्री असताना नाईक यांनी मुंबईत वाढत असलेल्या शिवसेना पक्षाचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल अकरा आमदार आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या तगड्या नेत्याला काँग्रेसमध्ये आणण्याचे काम केले. महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 25 जिल्हा परिषदामध्ये त्यावेळी काँग्रेसची सत्ता नव्हती. या सर्वच जिल्हा परिषदा काँग्रेसच्या ताब्यात आणण्याचे कार्य नाईक यांच्या नेतृत्त्वात झाले. याची दखल तत्कालीन काँग्रेसच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांना घ्यावी लागली. पर्यायाने सुधाकरराव नाईक यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले.

जिल्हा परिषद, नगरपालिकांची स्थिती सुधारण्याचे कार्य

राज्याचा मुलभूत पायाचा विचार सुधाकरराव नाईक यांनी केला. त्यामुळे यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यानंतर एक दुरदुष्टीचा नेता आणि कुशल प्रशासक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरील कामाचा ताण आणि जबाबदारी ओळखून सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यावेळी त्यांच्याच कल्पनेतून देण्यात आला. ऐवढेच नव्हेतर ज्या नगरपालिकाची आर्थिक स्थिती गंभीर आहे, अशा नगरपालिकांना सुद्धा एक कोटीचे अनुदान देण्याची योजना त्याच्यांच कार्यकाळात त्यांच्याच कल्पनेतून पुढे आली.

स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती

महाराष्ट्रात विविध योजना आहेत परंतु जलसंवर्धन करण्यासाठी कोणत्याही योजनेतून पुरेसा निधी नसल्यामुळे जलसंधारणाची कामे होत नाहीत. अशाने जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. हीच परिस्थिती राहीली तर येत्या पाच ते दहा वर्षात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल याचा अंदाज बांधून सुधाकरराव नाईक यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केली. अनेक योजनावरील निधी जलसंधारणाकडे वळता केला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जलसंवर्धनाची यशस्वी कामे त्यांच्या काळात झाली. नेत्याला जी दृष्टी असली पाहिजे त्यांची झलक त्यांच्या या निर्णयात होती.

वृद्ध भूमिहीनांना आर्थिक सहाय्य योजना

सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीचा आणखी एक नमुना येथे आवर्जुन सांगावासा वाटतो. तो म्हणजे बंजारा समाजातील तरुण मुले कुटूंबासह ऊसतोड व इतर कामासाठी बाहेर गावी जात. त्यामुळे वृद्ध मातापित्यांना उतारवयात आधार मिळत नसे. त्यांना अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागत असे. ही समस्या विचारात घेऊन सुधाकरराव नाईक यांनी ६० वर्षावरील वृद्ध भूमिहीनांना आर्थिक सहाय्य योजना सुरू केली. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात राहाणाऱ्या वृद्ध जोडपे यांची जगण्याची सोय झाली .संपूर्ण भारतात कुठेच वृद्ध भूमिहीनांना आर्थिक सहाय्य त्याकाळात दिले जात नव्हते.

महिलासाठी आयोगाची स्थापन

मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, सुधा वर्दे, सुधा कुलकर्णी, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्थापन करण्याची मागणी केली. तेव्हा अवघ्या एका आठवड्याच्या आत महिला आयोगाचा कायदा व स्वरूप याबाबतची समिती त्यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे या समितीत संस्था, काँग्रेस, जनता दल यांच्या प्रतिनिधीसोबत भाजप-सेना यांच्या जयवंतीबेन मेहता, सुधाताई चोरी यांचाही समावेश होता. त्याबद्दल सर्वांनाच शंका होती की एवढ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे एकमेकांशी कसे जमणार ? शेवटी सुधाकरराव नाईक यांनी महिला आयोगाच्या निर्णयाच्या फाईलवर सही केली. महिलासाठी आयोग स्थापन करून अमलात आणले.

अनअधिकृत बांधकामावर हातोडा

महाराष्ट्राला सुधाकरराव नाईक यांच्याबद्दलची आत्मीयता अधिक वाटते याचे कारण त्यांनी गुंडाची अनअधिकृत बांधकामे तोडली. कशाची पर्वा न करता माफिया, गुंड, भाई, दादा यांना त्यांनी कधीच भीक घातली नाही. एका पत्रकाराने त्यांना विचारले तुम्ही या लोकांशी काहीच घाबरत कसे नाही. त्यावर सुधाकरराव नाईक म्हणाले दऱ्याकपाऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजातील मी आहे हा संपूर्ण बंजारा समाज भित्रा नाही. त्यामुळे भीती वाटण्याचे काहीही कारण नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निर्मिती महाराष्ट्रात 1962 मध्ये झाली अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊन सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राची पुरोगामी भूमिका अधिक व्यापक करून काँग्रेसचे राज्य गोरगरीब जनतेपर्यंत अनेक विविध योजनेतून पोहोचवले. त्यामुळे अनेक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पोहरागड-उमरीगडेर … वारी पंढरपूरेती ..भारी………………!

महुआ मोइत्रा वादाच्या भोवऱ्यात…

सध्यस्थितीत वैचारिक राजकारण संपले आहे, असे वाटते का ?

1 comment

Madan November 19, 2021 at 11:58 PM

सुधाकर रावांनी उल्हासनगर आणि वसई मधील बारामतीच्या दलालांना चाप लावला म्हणून bhamatya काकांनी मुंबईत bomb स्फोट केले आणि दिल्ली सोडून खादाडी करायला परत आला

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading