सध्याच्या राजकिय घडामोडीवर भाष्य करणारी शिवाजी सातपुते यांची कविता… काय टेटस हाय
धोत्र्याच्या फांदीवर, भोपळ्याची फुलं,
कमळाच्या मांडीवर, कॉंग्रेसची मुलं,
बीनबंडी बिस्कुटाचे, ना खेळ ना खुळखुळा
कमळा गाई अंगाई, निज निज रे बाळा
विधानसभेच्या मुहुर्ताला, नवं बारसं होईल
उमेदवारांच्या यादीत, मग, यांचं नाव जाईल
बाकी अंगणवाडीत, पंचयती मार्गे बालवाडीत
विधानसभेचा रिझल्ट पाहुन, झेडपीच्या गाडीत
तो पर्यंत अंगणात खेळा, दुडुदुडु पळा
कमळा गाई अंगाई, निज निज रे बाळा
शिवाजी सातपुते.
मंगळवेढा, 9075702789
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.