दिवाळी... दिवे उजळुनी ही सजावी दिवाळी फटाके उडावे कळावी दिवाळी करंजी अनरसे चिरोटे मिठाई फराळात सा-या बुडावी दिवाळी शिरा गोड आणिक पुरी सोबतीला अशा जेवणाने चढावी दिवाळी कुणी एकटे ना असावे सणाला मुलामाणसांनी हसावी दिवाळी नको आज अंधार कुठल्या घराशी उजेडात झगमग नहावी दिवाळी जिथे आज पोटास नाही कुणाच्या मुखी घास द्यावा भरावी दिवाळी जळो घोर अंधार नैराश्य जावो प्रकाशात मग झगमगावी दिवाळी असा पाच दिवसात आनंद घ्यावा निरंतर मनाशी जपावी दिवाळी अशी जोड द्यावी नव्याची जुन्याला मनाने मनाशी जुळावी दिवाळी कथा काव्य लेखास वाचून आता सख्यांसोबतीने करावी दिवाळी सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी..

Home » उजेडात झगमग नहावी दिवाळी
previous post