March 28, 2024
tilganga-sahitya-prerana-award-to-marathi-books
Home » तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कादंबरी, कथा – कवितासंग्रहासाठी तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार व ललित लेख/प्रवासवर्णनासाठी तिळगंगा -प्रतिभा पुरस्कारासाठी पुस्तक पाठवण्याचे आवाहन

सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन आणि साहित्यिक व सांगीतिक उपक्रम आयोजित करणाऱ्या तिळगंगा साहित्यरंग परिवार, संगीतरत्न कै. ग. रा. पाटील (तात्या) संगीत मंच आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या वतीने साहित्य लेखनास प्रेरणा मिळावी म्हणून प्रथम कवितासंग्रह, कथासंग्रह आणि कादंबरीसाठी कवी, गझलकार विनायक गणपतराव कुलकर्णी पुरस्कार , सांगली पुरस्कृत स्व. गणपतराव शंकरराव कुलकर्णी ( तात्या ) जवळेकर स्मृती ‘तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार’ आणि प्रतिभा बुक्स, इस्लामपूर यांच्यावतीने ललित लेखसंग्रह / प्रवासवर्णनपर पुस्तकासाठी स्व. बाळासाहेब पाटील स्मृती ‘ तिळगंगा – प्रतिभा पुरस्कार ‘ प्रदान करण्यात येणार आहे.

१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या दोन वर्षाच्या कालावधीत प्रकाशित झालेल्या कविता, कथा व कादंबरी या साहित्यप्रकारातील साहित्यिकाच्या पहिल्या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुस्तकभेट असे या प्रेरणा पुरस्काराचे स्वरूप असून लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकाच्या दोन प्रती, अल्पपरिचय १० जानेवारी २०२३ पर्यंत पाठवण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मान्यवर साहित्यिकांच्या परीक्षणातून या पुरस्काराची निवड करण्यात येणार असून हे पुरस्कार २२ जानेवारी २०२३ रोजी पेठ येथे होणाऱ्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत.

आनंदहरी, समन्वयक व मुख्य निमंत्रक, तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन पेठ, ‘अद्वैत’ मंत्रीनगर, उपजिल्हा रुग्णालयानजीक, इस्लामपूर, जि. सांगली ४१५४०९ संपर्क :- ८२७५१७८०९९ / ९४२२३७३४३३ या पत्त्यावर पुस्तके पाठवावी असे आवाहन तिळगंगा साहित्यरंग परिवाराचे प्रमुख साहित्यिक मेहबूब जमादार यांनी केले आहे.

Related posts

अमिया महालिंगचा सन्मान

वडणगेचा गणेशोत्सव

अंतस्थ अनुभवांचे चित्रण

Leave a Comment