April 14, 2024
Dr B M Hirdekar speech on Shirayanchi Dharmaniti book
Home » शिवरायांचा धर्मविषयक विचार सर्वसमावेशक: डॉ. बी. एम. हिर्डेकर
गप्पा-टप्पा

शिवरायांचा धर्मविषयक विचार सर्वसमावेशक: डॉ. बी. एम. हिर्डेकर

डॉ. बी. एम. हिर्डेकर पुस्तकाविषयी म्हणाले…

  • हे पुस्तक डॉ. इस्माईल पठाण यांनी मावळ्यांना अर्पण केले आहे.
  • टेक्स्ट टेक्नॉलॉचीचा विचार करता हे पुस्तक टेक्नो पुस्तक आहे.
  • पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे.
  • छोटे खानी असणारे हे पुस्तक अभ्यासपूर्ण आहे.

शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानणारे होते. त्यांना आपल्या धर्माविषयी अभिमानही होता. पण तो इतका नव्हता की दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करावा.

डॉ. बी. एम. हिर्डेकर
B M Hirdekar speech on Pathan Sir book

शिवाजी महाराज यांनी हिंदूंचे नव्हे तर हिंदवी स्वराज्य उभे केले. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. सर्वसमावेशक असे धोरण त्यांनी राबविले. मावळा रेजिमेंट हे एकच रेजिमेंट त्यावेळी होते.

डॉ. बी. एम. हिर्डेकर

शिवरायांची धर्मनीती पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्यावतीने प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण लिखित “शिवरायांची धर्मनीती” या ग्रंथावर एकदिवसीय कार्यशाळेमध्ये बोलताना डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे एक उदारमतवादी राजे होते. सतराव्या शतकात असा राजा आपणाला इतिहासात दुसरा झालेला दिसत नाही. त्यांनी स्वधर्म रक्षणाबरोबरच इतर धर्मीयांविषयी त्यांचे धोरण सहिष्णू होते. स्वराज्य स्थापनेमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांना त्यांच्या कर्तबगारीनुसार मोठमोठी पदे दिली. तसेच शिवाजी महाराजांचा धर्मविषयक विचार समजून घेण्यासाठी डॉ. इस्माईल पठाण यांचे ‘शिवरायांची धर्मनीती’ हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे आणि तरुण पिढीने त्याचे निश्चितपणे वाचन करावे, असे प्रतिपादन केले. 

            अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. विलास पोवार यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकरी, स्त्रिया, सर्वसामान्य लॉक यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांचे धर्मविषयक धोरण हे सर्वव्यापी असे होते. त्यासाठी डॉ. पठाण यांचा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. अवनीश पाटील यांनी केले. तर आभार डॉ. दत्तात्रय मचाले यांनी मानले.

शिवरायांची धर्मनीती पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा

Related posts

मानव हीच जात, माणूसकी हाच धर्म

धुंदी वॉटरफॉल रॅपलिंगची !

बोलीमुळेच मराठी अधिक समृद्ध : आचार्य ना. गो. थुटे

Leave a Comment