December 8, 2022
Vilas Kulkarni Poem Abola
Home » अबोला
कविता

अबोला

अबोला

मौनं  सर्वार्थ साधनम
कटू शब्द करतात घाव
चालेल धरला अबोला
टाकू नको माझे नाव।

जरी रुसलीस फुला
नको भांडू ताव ताव
चालेल धरला अबोला
गाठू नको माहेरचे गाव।

स्त्री हट्ट जाणून आहे
हट्ट पुरविल सर्व काही
चालेल धरला अबोला
बोलू नकोस काहीबाही।

बोलणारे तू फुल अबोली
जाणून घे माझी देहबोली
चालेल धरला अबोला
होऊन जा तू प्रेम खुळी।

प्रणय धुंद हा पाऊस
फिरव सर्वांगी मोरपिसे
चालेल धरला अबोला
मज करू नको वेडेपिसे।

कवी – विलास कुलकर्णी

Related posts

मी एक बाप आहे

उरावर नाच

गोकूळी हवा धूंद आहे

Leave a Comment