मेघराजा का रे तू
इतका का चिडलास
काय गुन्हा त्या साऱ्यांचा
त्यांचा संसारच सारा
तू बुडव्हलास
इतके दिवस सारे तुझी
करत होते प्रतिक्षा
इतका कसा निर्दयी
झालास तू करू लागले
सारी तुझी उपेक्षा
तुझा रौद्ररूपाने घातला
महापुराचा तांडव
घरे झाली सारी बेघर
कुठे घालू आश्रयसाठी मांडव
नाही बघितले लहान सहान
नाही बघितली पाखरे,जनावरे
क्षणार्धातच कसे तू
गिळंकृत केले सारे
अक्राळ विक्राळ रुपापुढे तूझ्या
जनता सारी खंगली
मनी नव्या आशेची पहाट
अन् स्वप्न सारी भंगली
नदी, नाले, अन् धरणे
झाले सगळीकडे वहाते पाणी
डोळ्यातील आसवांना
वाट पूसतय का कोणी?
आला धरतीला पूर
झाली जलमय सारी सृष्टी
धीर धर ना थोडा आता
नको करु अतिवृष्टी
काय मिळवलेस तू
असे रूप धारण करून
मंदीरांनिही घेतलाय स्वतःला
जलाभिषेक करुन
✍️ शितल पोतदार
वडूज,सातारा