विदर्भ-मराठवाड्यात गुढीपाडव्याला गारपीटीची शक्यता आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
अवकाळीचे वातावरण व गारपीट –
शनिवार ( दि.६ ) ते बुधवार (दि.१० एप्रिल) पर्यंतच्या ५ दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. परंतु खान्देश व विदर्भ-मराठवाड्यातील २२ जिल्ह्यात मात्र गुढीपाडवा व करीला म्हणजे मंगळवार व बुधवार (९ व १० एप्रिल) असे दोन दिवस मध्यम अवकाळी पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता जाणवते.
किनारपट्टीवर दमटयुक्त उष्णता-
मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यात आज व उद्या दोन दिवस म्हणजे (६ व ७ एप्रिल, शनिवार व रविवारी) दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.