📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 28, 2026
काय चाललयं अवतीभवती

महिलांसाठी ‘वर्डप्रेस वुमेन डे’चे कोल्हापुरात आयोजन

Women WordPress Day 2026 digital empowerment event for women in Kolhapur

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय International Women’s Day निमित्त महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी कोल्हापुरात ‘वूमेन WordPress डे २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील वर्डप्रेस समुदायाच्या पुढाकारातून हा उपक्रम १४ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे.

कोल्हापूर येथे होणाऱ्या Women WordPress Day या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी WordPress समुदायातील आदिती शिंदे, स्नेहल काशीद व सृष्टी पाटोळे यांनी स्वीकारली आहे. ब्रँडिंग व डिझाइन क्षेत्रात कार्यरत अदिती शिंदे या Hybrid Inks Studio या डिझाइन स्टुडिओच्या प्रमुख असून त्या कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजकांपैकी आहेत. स्नेहल या WPGenius Solutions LLP येथे WordPress डेव्हलपर म्हणून कार्यरत असून वेब विकास क्षेत्रात त्यांचा चार वर्षांचा अनुभव आहे. तर तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्साही विद्यार्थिनी सृष्टी पाटोळे या कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग विषयात बी.टेक. शिक्षण घेत असून WordPress समुदायात सक्रियपणे योगदान देत आहेत.  

डिजिटल माध्यम, वेब डेव्हलपमेंट आणि कंटेंट निर्मिती क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविणे, तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात तज्ज्ञांची व्याख्याने, अनुभवकथन, चर्चासत्रे आणि परस्पर संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमातून वेब डेव्हलपमेंट, ब्लॉगिंग, डिझाईन, डिजिटल मार्केटिंग तसेच ओपन-सोर्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विविध संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे. नवोदित तसेच अनुभवी महिलांना आपले अनुभव मांडण्याची आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.

डिजिटल क्षेत्रात रुची असलेल्या विद्यार्थिनी, उद्योजिका तसेच वेब तंत्रज्ञानाशी संबंधित काम करणाऱ्या महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

दिनांक : १४ मार्च २०२६
वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी ३
उपक्रम : व्याख्याने, चर्चासत्रे, अनुभवकथन, नेटवर्किंग सत्र

सहभागी होण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://events.wordpress.org/kolhapur/2026/WomensDay/

Related posts

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या ‘ सूर्यभान ‘ काव्यसंग्रहाचे ८ रोजी प्रकाशन

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मातृमंदिरच्या संत वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406