📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 31, 2026
काय चाललयं अवतीभवती

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने

Meeting of All India Digital Media Editors Journalists Association in Kolhapur

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिव पदी विकास भोसले

कोल्हापूर – अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड निवड केंद्रीय व राज्य कार्यकारणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील सतीश भाऊ सावंत राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील यांची तर राष्ट्रीय सचिव पदी तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या देखील निवडी करण्यात आल्या.

यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी, सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्याभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Related posts

संत ग्रंथ पुरस्कार योजनेचे पुरस्कार जाहीर

वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर

कोडिंगपासून एआयपर्यंत : वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६ मध्ये वर्डप्रेस करिअरसाठी दिशा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406