संमेलनाध्यक्षपदी : डॉ. रणधीर शिंदे ; स्वागताध्यक्ष: अपर्णा पाटील
आळसंद ( ता. खानापूर ) येथील स्व. श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा, साहित्य, संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्यावतीने सोमवारी ( ता. २२ ) सकाळी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द साहित्यिक, राज्य साहित्य, सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. प्रा. रणधीर शिंदे ( कोल्हापूर ) यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे, अशी माहिती संयोजक संग्राम जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, आळसंद नगरीत सकाळी ९ वाजता सिध्दनाथ मंदिरापासून ग्रंथ दिंडी निघणार आहे. यामध्ये टाळ, मृदुंगांचा गजर, वारकरी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. कवयित्री अपर्णा पाटील ( कोल्हापूर ) स्वागताध्यक्ष आहेत. सरपंच अभिनंदन जाधव , सुभाष पाटील , धर्मेंद्र पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
ते म्हणाले, दुसऱ्या सत्रात गझलकार सुधीर इनामदार ( आटपाडी) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. यावेळी महेश कोष्टी , सुनिल दबडे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी , एकनाथ गायकवाड प्रमुख उपस्थित आहेत.
अशोकराव देशमुख, खंडेराव जाधव , प्रा. विश्वनाथ गायकवाड, रत्नकुमार नरुले , विनोद जाधव , दीपक पवार , गणेश शेटे , शरद माळी , रमेश कोष्टी , दीपक सावंत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.