July 21, 2024
They are called real farmer leaders these days
Home » त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते…
कविता

त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते…

ॲड.लखनसिंह कटरे हे युवक असताना संघर्ष वाहिनिशी निगडित राहिले. पुढे शासकीय नोकरीत राहिले. ते ख्यातनाम कवी आहेत. शेतीशी थेट संबंध असल्यामुळे त्यांना शेतकरी प्रश्नाची जाण आहे. वकील असल्यामुळे त्यांना कायद्याचा विळखा कळतो. त्यांची ही कविता बरेच काही सांगते.

त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते.

(18 जून या शेतकरी पारतंत्र्य दिवसा निमित्त)

जाता येता टपली मारण्याची ज्यांना हुक्की येते,
त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते…

उडता उडता शिटत जाती जे गांडी-तोंडातून
संवादाची पण कधी ना त्यांची हिंमत होते
त्यांनाच म्हणती…

भुईमुगाचे ‘झाड’ पाहून शेतात बहरलेले,
फळ लागले नाही म्हणून जे चुकचुकत होते
त्यांनाच म्हणती…

मोठा, मध्यम, अल्प, अत्यल्प अशी फूटपाडी,
ज्यांची भाषा आणि करणीही सदा असते
त्यांनाच म्हणती…

धानालाच म्हणती भात, तांदूळ तोंडभर घेऊन,
चिखलाची मात्र त्यांना दुरूनच शिसारी येते
त्यांनाच म्हणती…

जगवण्या ठलाल, दलाल, ऐतखाऊ मतदार (?)
शेतकऱ्यांना लुटणे हीच खरी त्यांची नीती असते
त्यांनाच म्हणती…

शेतकऱ्यांना दाखवून ‘फसव्या’ कर्जमाफीचे गाजर
करबुडव्यांचे मोठाले कर्ज ‘खरेच’ राईट-ऑफ होते
त्यांनाच म्हणती…

पारतंत्र्यात कोंबून शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क,
संविधानही बदलून ¤ ‘परिशिष्ट नऊ’ ¤फुगत जाते
त्यांनाच म्हणती…

उद्योग, व्यापारादि नफादायक धंदे करा कितीही,
शेतकऱ्यांना मात्र धारणाक्षेत्रावर सिलिंगची भूते
त्यांनाच म्हणती…

शेतकऱ्यांनी रहावे सदैव तंगी आणि गरीबीतच
ध्यानीमनी सदा, ज्यांनी जोपासली हीच सारी मते
त्यांनाच म्हणती…

कैवारी सच्चे शेतकऱ्यांचे पाडले जातात बाजूला
फसवे, संदिग्ध बोलबच्चन पसरती जिथेतिथे
त्यांनाच म्हणती…
¤
(*संशोधित संविधानातील परिशिष्ट नऊ मध्ये सर्व शेतकरीविरोधी कायदे समाविष्ट केले जातात, कारण या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्याच्या संवैधानिक वैधते/अवैधतेबाबत, संविधानातील संशोधित अनुच्छेद 31B सहवाचन अनुच्छेद 31A मधील तरतुदीनुसार, कोणत्याही/सर्वोच्च/उच्च न्यायालयातही दाद मागण्यालाच प्रतिबंधित करण्यात आले आहे.)

ॲड.लखनसिंह कटरे,
मो. 96650 41483
बोरकन्हार – 441902, (जि. गोंदिया)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

दरडी का कोसळतात?

कडा येथील साहित्यज्योती पुरस्कार जाहीर

अमरवेल पुस्तकास शब्दांगण पुरस्कार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading