कोल्हापूरः अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय जात वर्ग भेदभाव ओलांडून माणसांच्या प्रश्नांची, माणुसकीची जाणीव जागी ठेवते. त्यांचे मानवतावादी परंपरेतले लेखन आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्मयात वंचित शोषित समाजाची दुःखे आहेत. या समाजाच्या संघर्षाच्या कथा त्यांनी मांडल्या. असे प्रतिपादन कवी लेखक अजय कांडर यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाच्यावतीने आयोजित ‘अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय : पुनर्शोधाच्या वाटा’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी बोलताना केले.
या परिसंवादात अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्मयातील भटक्या विमुक्त जमातींचे चित्रण या विषयांची मांडणी प्रकाश नाईक यांनी केली.
प्रकाश नाईक यांनी केलेली सुंदर मांडणी ऐकण्यासाठी पॉडकास्टवर क्लिक करा
अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनातील जातवास्तव संबंधी प्रा. सोमनाथ कदम यांनी भारूड केले.
प्रा. सोमनाथ कदम यांनी व्यक्त केलेले विचार ऐकण्यासाठी पॉडकास्टवर क्लिक करा
नव्या संशोधकांनी प्रा. सुनीता बोर्डे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनातील स्त्रीजीवनाचे चित्रणाच्या व्याप्तीचे वेगळेपण व महत्व विशद केले.
प्रा. सुनीता बोर्डे यांनी व्यक्त केलेले विचार ऐकण्यासाठी पॉडकास्टवर क्लिक करा
प्रा. निरंजन फरांदे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्मयीन लेखन कार्यामागील वर्ग जाणिवांची विचार परंपरा स्पष्ट केली.
प्रा. निरंजन फरांदे यांनी व्यक्त केलेले विचार ऐकण्यासाठी पॉडकास्टवर क्लिक करा
एकंदर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाच्या पुनर्शोध व पुनर्दृष्टी अभ्यासकांच्या मांडणीत होती. या प्रसंगी डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शरद गायकवाड तसेच अभ्यासक व विद्यार्थी उपस्थित होते. या परिसंवादाचे प्रास्ताविक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले तर परिचय राजेश पाटील यांनी केला. आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले तर, सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.