April 24, 2024
Call for submission of books for Anusaya Jadhav Memorial Literary Award
Home » अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नांदेड येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र यापैकी एका साहित्यकृतीस हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख व मानपत्र असे आहे, अशी माहिती डॉ. माधव जाधव यांनी दिली आहे.

१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र या पुरस्कारासाठी पात्र असतील. या वाङ्मयप्रकारातील पहिल्या साहित्यकृतीची प्रथम आवृत्ती या पुरस्कारासाठी पाठवावी. साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख १० मे २०२४ अशी असून अधिक माहितीसाठी ९४२३४३९९९१, ९६५७४७८८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता:
संयोजक, अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार, द्वारा डॉ. माधव जाधव, ०६, कुळवाडी साई नगरी, तरोडा पोस्ट ऑफिस, काबरा नगर जवळ, वाडी (बु.), नांदेड – ४३१ ६०५ भ्र.: ९४२३४३९९९१, ९६५७४७८८४४

Related posts

स्पर्धा परीक्षा आपण आणि काळ

राजर्षी शाहू अभ्यासकांसाठी अमुल्य असा ठेवा

यशस्वी जीवनासाठीच गीतेचे, ज्ञानेश्वरीचे पठण

Leave a Comment