December 10, 2022
full-mixed-food-leads-to-nutrition-milk-growth article by Krushisamarpan
Home » पूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ

🐮 पूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ 🐮

आहारातील वेगवेगळे खाद्य

घटक योग्य त्या प्रमाणात काळजीपूर्वक एकत्रित करून जनावरांना खाऊ घालावेत, अशा पद्धतीने आहार खाऊ घालण्याच्या पद्धतीला पूर्ण मिश्रित आहार असे म्हणतात. पूर्ण मिश्रित आहारामुळे जनावरांना सर्व पोषकतत्त्वांचा एकाच आहारातून पुरवठा होतो.

पारंपरिक पद्धतीनुसार जनावरांना धान्य, हिरवा

चारा, सुका चारा, मुरघास व पशुखाद्य हे वेगवेगळे खाऊ घातले जातात, त्यामुळे जनावरे आपल्या आवडीचे खाद्य निवडून खातात, त्यामुळे अतिशय बारीक खाद्य व चाऱ्याचे मोठे तुकडे तसेच राहतात. पूर्ण आहारातून दिलेले प्रथिने व ऊर्जेचे गुणोत्तर असमतोल होते आणि जनावरांची अन्नपचन क्रिया मंदावते. शरीराला आवश्यक असलेले पोषणतत्त्वे शोषले जात नाहीत, त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होतो आणि जनावर विविध आजारांना बळी पडते.

पूर्णमिश्रित आहार (TMR) म्हणजे काय?

पूर्ण मिश्रित आहार, ही एक खाद्य पद्धत आहे, ज्यामध्ये विविध खाद्य घटक ठराविक प्रमाणात एकत्रित करून दिले जातात. या खाद्य घटकांमध्ये मुरघास, धान्य, प्रथिने, पेंड (सरकी, सोयाबीन पेंड इ.) हिरवा किंवा सुका चारा (ज्वारी, मका, बाजरी इ.), गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा (भुसा), खनिज मिश्रण, जीवनसत्व पावडर, मीठ, इस्ट, बफर, बायपास फॅट इ. खाद्य घटकांचा समावेश होतो.

पूर्णमिश्रित आहार खाऊ घालण्याचे फायदे-

 • पूर्ण मिश्रित आहारामुळे जनावराला संतुलित पोषकतत्त्वांचा पुरवठा होतो.
 • विन्याच्या २-३ आठवडे आधी आणि २-३ आठवडे नंतर जनावराचे शरीर क्षीण झालेले असते.
 • पूर्ण मिश्रित आहारामुळे जनावरांची प्रतिकारक्षमता वाढते आणि चयापचयाच्या समस्या कमी करते.
 • निवडक खाद्य खाण्याच्या जनावरांच्या सवयीला आळा बसतो.
 • पचनक्रिया आणि आहाराची पाचकता वाढते.
 • उपलब्ध निकृष्ट चारा आणि इतर टाकाऊ खाद्याचा वापर करून पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो.
 • जनावरांच्या पोटातील शरीराला उपयोगी असलेल्या जीवाणूंच्या वाढीसाठी लागणारे प्रथिने, ऊर्जास्रोत आणि कर्बोदकांचा दिवसभरात एकसमान प्रमाणात पुरवठा होतो.
 • योग्य पद्धतीने पूर्ण मिश्रित आहार खाऊ घातल्यास प्रती दीन दुधाचे प्रमाण १ ते २.५ लिटरने वाढते.
 • सर्व घटक एकत्र असल्यामुळे जनावरे कमी रुचकर खाद्य घटकही खातात.
 • या पद्धतीत यंत्राचा वापर केल्यास मजुरांवरील खर्च आणि वेळही वाचवता येऊ शकतो.

पूर्ण मिश्रित आहार कसा बनवावा?

 • जनावरांची पोषणतत्त्वांची गरज ही त्याच्या वजनानुसार, रोजच्या खाद्य सेवनानुसार आणि दुधाचे प्रमाण या तीन गोष्टींवर अवलंबून असते.
 • दुधाळ जनावरांसाठी पोषणतत्त्वांची गरज ही नेहमी दुधाच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त आणि पहिल्या वेताच्या गायीसाठी ३० टक्क्यांपेक्षा जास्त असावी.
 • प्रथिने, हिरवा चारा, सुका चारा, प्रथिने, ऊर्जा आणि जीवनसत्त्वे या खाद्य घटकाचा विचार करून आवश्यक तितक्या प्रमाणात मोजमाप करून योग्य त्या खाद्याचा वापर करावा.
 • हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे २ ते २.५ सेंमी आकाराचे तुकडे करून घ्यावेत. या चाऱ्यामध्ये धान्य, पेंड, खनिज मिश्रण, जीवनसत्त्वे, इस्ट पावडर मिसळावी. मुरघास मिसळून हे मिश्रण काळजीपूर्वक एकत्रित करून जनावरांना खाऊ घालावे.

पूर्ण मिश्रित आहार खाऊ घालण्यासाठी जनावरांचे वर्गीकरण –

 • विन्यासाठी २-३ आठवडे असलेल्या गायी
 • विल्यानंतर २-३ आठवड्यांनंतरच्या गायी
 • विल्यापासून ३० ते १५० दिवसांपर्यंत
 • विल्यापासून १५० ते २१० दिवसांपर्यंतच्या गायी
 • पहिल्या वेताच्या गायींचा वेगळा गट
 • गाभण गायींचा गट

पूर्ण मिश्रित आहारा संबंधी महत्त्वाचे…

आहारातील घटकांचा आकार खूप लांब किंवा खूप लहान नसावा. त्यातील घटक हे एका विशिष्ट क्रमानेच एकत्रित करावेत. उत्तम दर्जाचे खनिज मिश्रण वापरावे.आहार दिवसातून २ ते ३ वेळेस (सकाळी व संध्याकाळी) द्यावा.आहार दिल्यानंतर दररोज जनावरांचे निरीक्षण करून त्यानुसार आहारात बदल करावा. कारण जनावर हवे असलेले खाद्य संपवतील आणि नको असलेले खाद्य शिल्लक ठेवतील. त्यामुळे जनावरांच्या पोटातील आम्लपित्त वाढू शकते.

|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||

🌳 सौजन्य – कृषिसमर्पण 🌳

Related posts

ठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे…

व्हीगन फुड म्हणजे काय ?

सडे संवर्धन काळाची गरज

Leave a Comment