शब्द ही विलीन झाले....! आज कविता शांत झाली नकळत शब्द शब्दातून मुक्त झाली सुचत नाही शब्द मला वाचा बंद झाली समाजात ही हळहळ पसरली सरणावर जळते कविता धूर आभाळी गेला क्षणात ती राख होईल जिथे तिथे वार्ता कळे दु:खाची ही कहाणी शेवट ती कशीच ? आली समाजात वावरणारी ती संघर्ष करणारी कविता आम्हातून निघून गेली झाले अबोल शब्द माझे कळता गज़ल तुझी आज कशी? अश्रुची धारा नयनातूनी आली नुसते शब्द जळतात साहित्यातून तो अंगारा कसा ? ग! लावू कंपाळी नाही भाग्य कुणाचे ? इथे असे त्यातून ती एक कविता माझी जुने शब्द पुरोगामी झाले विचारवंतासाठी सदा लेखक ही आत्मकथा लिहू लागले माझी तुझला अर्पण करीतो कविता अन् ते शब्द ही आत्ता विलीन झाले कवी : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा. मो. ९६३७१६४१८९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.