January 27, 2023
Nimshirgaon Sahitya Samhelan in May
Home » निमशिरगाव येथे २८ व २९ मे रोजी साहित्य संमेलन
काय चाललयं अवतीभवती

निमशिरगाव येथे २८ व २९ मे रोजी साहित्य संमेलन

निमशिरगाव येथे लोकसहभागातून गेली २५ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविले जाते आहे. यंदा या संमेलनाचा रौप्यमहोत्सव आहे. यंदाचे संमेलन दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय संयोजन समिंती व निमशिरगाव ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची निवड केली आहे.

जयसिंगपूर – निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे येत्या २८ व २९ मे रोजी साहित्य सुधा मंचचे रौप्यमहोत्सवी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे 32 वे साहित्य संमेलन असे संयुक्त साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची निवड केली आहे.

निमशिरगाव येथे झालेल्या साहित्य सुधा मंचचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, साहित्य सुधा मंचचे अध्यक्ष पद्माकर पाटील व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे भिमराव धुळूबुळू यांनी ही माहिती दिली.

निमशिरगाव येथे लोकसहभागातून गेली २५ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविले जाते आहे. यंदा या संमेलनाचा रौप्यमहोत्सव आहे. यंदाचे संमेलन दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय संयोजन समिंती व निमशिरगाव ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २८ व २९ मे रोजी ही संमेलन घेण्याचे नियोजन केले आहे. या संमेलनामध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभाही सहभागी होत आहे.

या संमेलनाची सुरूवात महादेव मंदिरातून ग्रंथदिंडीने होईल. संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होत आहे. परिसंवाद, कथाकथन, ज्येष्ठ साहित्यिकाची प्रकट मुलाखत, निमंत्रितांचे कविसंमेलन, माजी अध्यक्षांचे अनुभव कथन, नाट्याविष्कार, नवोदितांचे कवीसंमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

Related posts

फेब्रुवारीमध्ये मुंबईत जागतिक मसाले परिषद

गावोगावी ज्ञान वाटत फिरणारा शिक्षणप्रेमी…

चला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…

Leave a Comment