March 5, 2024
Farm Producer Organisation Double in Lockdown Period in Maharashtra
Home » लॉकडाऊनमध्ये शेतकरी उत्पादक संघटनेची संख्या दुप्पट !
काय चाललयं अवतीभवती

लॉकडाऊनमध्ये शेतकरी उत्पादक संघटनेची संख्या दुप्पट !

लॉकडाऊनच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक संघटनेच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाल्याची माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सीने (आत्मा) दिली आहे. 2020 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 1622 शेतकरी कंपन्या स्थापित झाल्या आहेत. 2019 च्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या कंपन्यांने पाच हजारांचा टप्पा पार केला असल्याचेही आत्माच्यावतीने सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी विविध ठिकाणचे शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना विकली. विक्रीचा व्यवसाय वाढवण्यासाठी या शेतकऱ्यांच्या गटांना कायदेशीर ओळख गरजेची होती. यामुळेच शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी उत्पादक संघटनेची नोंदणी केली आहे.

2005 मध्ये महाराष्ट्रात केवळ चारच शेतकरी कंपन्या होत्या. 2010 पर्यंत यात वाढ होत ही संख्या 30 वर पोहोचली. 2011 ते 2015 या कालावधीत 654 कंपन्या होत्या. 2016 मध्ये 322 शेतकरी कंपन्यांची नोंद महाराष्ट्रात झाली. 2017 मध्ये 285 तर 2018 मध्ये 354 आणि 2019 मध्ये 807 कंपन्या स्थापण्यात आल्या. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकरी कंपन्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. 2020 मध्ये 1622 शेतकरी उत्पादक संघटनेची नोंद करण्यात आली आहे.

एप्रिल 2021 पर्यंत राज्यात 993 शेतकरी कंपन्यांची नोंद झाली आहे. राज्यात 30 एप्रिल 2021 पर्यंत 5171 कंपन्यांची नोंद करण्यात आली असल्याचे आत्माच्यावतीने सांगण्यात आले आहे.

विभागावर स्थापन झालेल्या कंपन्यांची संख्या अशी – कोकण विभाग 175, नाशिक विभाग – 678, लातुर विभाग – 949, कोल्हापूर विभाग – 521, औरंगाबाद विभाग – 858, पुणे विभाग – 1011, अमरावती विभाग – 636 तर नागपूर विभाग – 343 अशी एकूण कंपन्यांची संख्या 5171 इतकी आहे.

आत्माचे संचालक के. एस. मुळे म्हणाले, 2017 मध्ये अर्थमंत्र्यांनी वार्षिक अर्थसंकल्पातील भाषणात शेतकऱ्यांना कंपन्या स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर शेतकरी उत्पादक संघटनेच्या संख्येत वाढ होत राहीली. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतमालाची थेट विक्री शहरामध्ये केली. या एकत्र आलेल्या गटांना त्यांचा धंदा वाढवण्यासाठी आर्थिक संस्थांची आणि विविध सरकारी संस्थांची मदत गरजेची वाटली. शेतकरी कंपनी जो पर्यंत नोंद होत नाही तोपर्यंत त्यांना व्यवसाय वाढवणे अडचणीचे होते.

समाविष्ट सदस्यांची एकरूपता आणि एफपीओ कार्याबद्दलची त्यांची वचनबद्धता सदस्यांनी स्वत: एफपीओमध्ये कायम ठेवली पाहिजे, जेणेकरुन संस्था सहजतेने चालतील. यात किती शेतकरी पूर्णवेळ गुंतले आहेत याचीही पडताळणी करण्याची गरज आहे

विजयअन्ना बोराडे

कृषी तज्ज्ञ, औरंगाबाद

Related posts

सावळी

…तर सन २१००पर्यंत पृथ्वीचे तापमान २.८ ते ६ अंश सेल्सिअसनी वाढेल – सोळंकी

Navratri Biodiversity Theme : जैवविविधतेची मोरपंखी छटा…

Leave a Comment