February 22, 2024
Fetus inflammation in animals
Home » सुप्त गर्भाशयदाहाचा वेळीच करा प्रतिबंध
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुप्त गर्भाशयदाहाचा वेळीच करा प्रतिबंध

पशु आरोग्य ही व्यवस्थापनातील महत्वाची बाब असते. प्रतिबंधातून अनेक अडथळे टाळता येतात. रोग जंतूमुळे पशु आरोग्याची मोठी हानी होते. रोग जतूंचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तत्काळ उपाय योजना करणे आवश्यक ठरते.

 निरोगी किंवा आजारी लक्षणावरून पशुपालक पशु आरोग्य स्थिती ओळखू शकतो. जनावरांचे दररोज पडणारे शेण किंवा मुत्र यांचे प्रमाण ,प्रत, रंग यावरून पचनाच्या शरींरक्रियातील दोष कळू शकतात. योनी मार्गातून वाहणारे स्त्राव प्रजनन अवस्थेनुसार आहेत किंवा नाही याचेही  निदान पशुपालक स्वत: करू शकतो. माजाचा स्त्राव स्वच्छ आहे काय याचीही लक्ष दिले जाते. अशी काळजी घट जात असतानाही सुप्त गर्भाशयदाह होत असतो  आणि प्रजननाची हानी होत असते.

 गर्भाशयाला दाह होणे म्हणजे गर्भाशयदाह. गर्भाशय हा प्रजनन संस्थेचा महत्वाचा भाग आहे. जन्मणाऱ्या वासराचे गर्भावस्थेत उबदारपणे पोषण करणारा तो मखमली पाळणा असतो.अशा गर्भाशयास इजा, दाह, रोगप्रसार, औषध सोडण्यासाठी हाताळणी , वार ओढून  काढताना जखमा होतात , उघड्या गर्भाशय मुखातून रोगाचा शिरकाव होऊन हानी होते. प्रसुती नंतर पंधरवाड्यात गर्भाशयदाह होण्याची शक्यता अधिक असते.

  गर्भाशयदाह हा तीव्र आणि सौम्य स्वरूपाचा असतो. तीव्र गर्भाशयदाह झाल्यास योनी मार्गावाटे घट्ट, पु, पातळ पु, रक्त मिश्रीत पु, पांढरे धागे असणारा स्त्राव दिसून येतो. शेपूट.मंदी, निरन यांना पातळ पांढरा पडदा चिकटलेला, वाळलेल्या अवस्थेंत आढळतो. यावरून गर्भाशयदाह झाला असल्याचे जागरूक पशु पालकांच्या लक्षात येते व उपचार करून घेतला जातो.

सुप्त/सोम्य गर्भाशयदाह असल्यास दिसून येत नाही. जनावरांच्या योनी मार्गातून वाहणारा स्त्राव थोडा धुकट,धूसर असतो, मात्र तो रंग हिनच असतो.संपूर्ण स्त्राव स्वच्छ असणे शेवटचा भाग मात्र थोडा धूसर ,पांढरट, धागे असणारा दिसून येणे हि सुप्त सुप्तगर्भाची  निदर्शक बाब असते. नजर बारीक असल्याशिवाय आणि स्त्राव बाहेर पडताना त्याचा प्रत्येक भाग बारकाईने पाहिल्याशिवाय  सुप्त गर्भाशयदाह कळू शकत नाही.

     गर्भाशयदाह असल्यास फाळण न होणे, गर्भ धारण होण्यासाठी अनेक वेळा रेतन करावे लागणे म्हणजे  जनावरे उलटणे, व्याल्यापासून पुढील गर्भधारणा होणारा काळ लांबणे अशा तोट्याच्या बाबी घडून येतात. जनावरांची प्रजनन क्षमता कमी करणारा गर्भाशयदाह आर्थिक नुकसानीस कारणी भूत ठरतो.

    प्रसुती नंतर गर्भाशयदाह घडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रसुतीच्या वेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण काटेकोरपणे न पाळणे जाणे हेच मुख्य कारण गर्भाशयदाह होण्यास पूरक ठरते.गोठे, परिसर, बाह्य जननेद्रीये, दुषित पाणी,वातावरण यात रोग घडविणारे अनेक रोग जंतू असतात . मात्र असे रोग जंतू सद्रुड शरीराने नियत्रंनात ठेवलेले असतात. प्रसूतीमुळे होणारा शारीरिक  तान व कमी झालेली रोगप्रतीकारक शक्ती अशा जंतूचा प्रसार, शरीरात रोग घडविण्यास आणि प्रामुख्याने गर्भाशयावर हल्ला करून दाह निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो.

   प्रसुतीनंतर सुप्त गर्भाशयदाह घडतो, मात्र दिसून येत नाही असे रोगी गर्भाशय अत्यंत कमी प्रमाणात रोगजंतू मिश्रित स्त्राव सतत बाहेर टाकत असते.आणि त्यातूनच कास दाह होण्याचे प्रमाण वाढते. सुप्त गर्भाशयदाह झाला कि सुप्त कास दाह होणे अपेक्षित  असते. यातून दुधप्रत कमी होते, दुधाचे प्रमाण कमी होते व आर्थिक तोटा होतो.

  सुप्त गर्भाशयदाह जर दिसून येत नाही,  निदर्शनास येत नाही तर तो झाला आहे का नाही हे कसें पडताळावे हा  पशुपालकांचा खरा प्रश्न असतो. सुप्त गर्भाशयदाह पशुपालकच नव्हे तर पशुवैद्यकास ही  नेहमी केल्या जाणाऱ्या लैंगिक /प्रजानन तपासणीत निदान होऊ शकत नाही. हा प्रकार म्हणजे नेहमी उदाहरण दिले जात असते ते म्हणजे,”स्वच्छ दिसणारे पाणी निर्जंतुक म्हणता येत नाही” असाच असतो.

  पहिल्या माजास जनावरे कृत्रिम रेतानाने भरू नयेत असा तांत्रिक संकेत आहे. प्रसूती नंतर च्या पहिल्या माजास कृतीम रेतन न करता त्यांचा बळस/सोट जंतू विरहीत आहे काय याचे परीक्षण करणे शहाणपणाचे ठरते.या माजा ची होणारी स्त्रावाची तपासणी , प्रयोग शाळेतील निदनेना द्वारे स्त्राव म्हणजे गर्भाशय निरोगी असल्याची खात्री अमी पुढील माजास नियमितपणे आलेले माजाचे चक्र यामुळे जनावरे एकाच वेतनात गाभण ठरण्याची शक्यता फार मोठी असते.

 काही जनावरात खालावलेले प्रकृतीमान , वातावरणाचा ताण, प्रसूती पाशात रोगप्रसार, दुध उत्पादनामुळे शरीर झीज झाल्यास सुप्त गर्भाशय दाह घडून प्रजनन क्रियेत अडथळा निर्माण म्हणजे जनावरे तर अगदी योग्य वेळी माजावर येतात पण गाभण  ठरत नाहीत. सुप्त गर्भाशयदाह घडू नये आणि तो अनपेक्षित रित्या प्रसूती नंतर  झाल्यास तात्काळ बारा करणे या बाबत पशु पालकांनी मोठी काळजी घ्यावी.

   प्रसूती नंतर दररोज जनावरांचे तापमान नोंद करणे आणि त्यांच्या गर्भाशयातून येणारा स्त्राव लक्ष पूर्वक पडताळणे गरजेचे असते. सामान्यपणे सुलभ प्रसूती झालेल्या जनावरात आरोग्य अबाधित असण्याची शक्यता असते तर कष्ट प्रसूती झालेल्या जनावरात  गर्भाशयदाह होण्याची शक्यता असते म्हणून कष्ट प्रसूती नंतर गर्भाशय पूर्ववत  येण्यासाठी मदत करणारे, रोग प्रतिबंधासाठी प्रतीजैविकंचा , उर्जा वाढवणारा उपचार पशुवैध्याकडून करून घ्यावा.

 बाह्य लक्षणांच्या  नोंदीवरून सुप्त गर्भाशयदाहचा धोका ओळखता येतो. जनावरांचे समोरून निरीक्षण केल्यास त्यांचा श्वास ,भूक, वागणूक कान, डोळ्यांची त्वचा ,ओठावरचा ओलेपणा याबाबत व पाठीमागून निरीक्षण केल्यास स्त्राव ,शेन, कासेच भारलेपणा , शेपूट धरण्याची ठेवण कळू शकते. या नोंदी वरून दिसून येणारा फरक ज्या पशुपालकांना कळू शकतो त्यांना सुप्त गर्भाशयदाह थोपविणे व त्यासाठी योग्य उपाय योजना करणे शक्य होते.

    ज्या जनावरांना प्रसुती नंतर ताप आला नाही व त्यांचा स्त्राव वासरहीत  असेल तर त्या जनावरांची भूक किती ते पाहावे. यात भूक भरपूर असणारी जनावरे आरोग्य टिकवून आहेत असे सिद्ध होते. तर भूक कमी असणारी जनावरे दुध उत्पादनाशी निगडित दुग्ध ज्वर, रक्त मूत्र , कीतोसिसं, क्षार कमतरता आदी मुळे होणाऱ्या आजारांच्या तपासणीचे निष्कर्ष , पशुवैद्यकांची तपासणी , योग्य निदान घडून आल्यास खात्रीशीर उपाय,  योग्य उपचार योजणे आणि सुप्त गर्भाशय दाह  रोखण्याची शक्ती शरीरात निर्माण करणे शक्य होते.

   प्रसूती नंतर ज्या जनावरांना ताप नाही मुत्र स्त्राव हा दुर्गंधीत आहे अशा वेळी तात्काळ प्रतीजैविके टोचण्यासाठी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.या प्रकारात सुप्त गर्भाशय दाह होण्याचा धोका फार मोठा असतो. रोगजंतूंचा प्रादुर्भाव होण्यास असे वातावरण, शरीर व गर्भाशयात पोषक असते. योग्य औषधी , त्यांची योग्य मात्रा आणि योग्य काळापुरता उपचार झाल्यास जनावरांचा अनारोग्याचा धोका टाळता येतो.

   प्रसूती नंतर ताप दिसून येणाऱ्या जनावरात स्त्राव वास रहित असल्यास कासदाह, फुफ्फुस दाह असण्याची शक्यता असते. सुप्त गर्भाशय दाह व सुप्त कासदाह यांचा सरळ संबंध आहे. प्रसूती नंतर रोग जंतुंना कास व गर्भाशय येथे फैलाव साधण्यास पोषक वातावरण मिळून दाह इतर अवयवात,ताप, शरीरात आणि संसर्ग कास व गर्भाशयात सुप्त अवस्थेत घडतो.

  तापमापक असणे आणि त्याचा वापर करता येणे ही बाब शिक्षित आणि व्यावसायिक पशुपालकांसाठी अगदी सामान्य आहे .श्वास, नदी, ताप यांच्या नोदी दररोज पशु पालकाने कराव्यात आणि आजारपणाची चाहूल लागताच पशुवैद्यकाकांडून  निदान करून उपचार करून घ्यावेत. प्रसूती नंतर १०३ अंश फॅरेनाईड पेक्षा जास्त ताप हा सुप्त गार्भाशय दाह आणि सुप्त कास दाह साठी धोक्याचा लाल दिवा समजावा.

 गर्भाशयाचा रक्त पुरवठा वाढविणणे, रोग प्रतिकारकशक्ती निर्माण करणे, रोगजंतूंचा फैलाव थांबविणे , जास्तीत जास्त स्त्राव निर्माण करून गर्भाशयातील अशुद्ध बाबी बाहेर टाकणे, गर्भा शायास कळा निर्माण करणे अशा तत्वावर आधारित उपचार पद्धती सुप्त गर्भाशय दाह थांबविणे, बरा करणे, रोखणे यासाठी वापरण्यात येते.पशुवैधकीय निदान, उपचार, पद्धती, आणि कोशल्य, अनुभव, आधारित मार्गदर्शन यातून सुप्त गर्भाशय नियत्रण शक्य आहे. आपल्या दुधाळ जनावरात प्रसूती नंतर कुठलाही डथळा निर्माण होणार नाही, गर्भशय पूर्वस्थितींत येण्याची प्रक्रिया जलद पूर्ण होईल यासाठी प्रसूती नंतर १५ दिवस जनावारांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते.

Related posts

हे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…

आठवणींच्या रसाने ओतप्रोत भरलेले लेख

सिंगोनियमची लागवड…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More