कागदी फुल कागदी फुलाला कधी गुलाबाची सर येत नाही गुलाबा सारखा कधी कागदी फुलांचा असर होत नाही कागदावर मिळते जरी मालकी इमारतीची त्या इमारतीचे कधीही घर होत नाही कागदी फुलाला कधी गुलाबाची सर येत नाही करार होतात हल्ली नात्यांचेही कागदोपत्री पुर्वी सारखा नात्याला ही गहिवर येत नाही कागदी फुलाला कधी गुलाबाची सर येत नाही आई बापाला नसेल जर तुझ्या बंगल्यात रहायला जागा बंगल्यात ल्या बागेला तुझ्या कधी बहर येत नाही कागदी फुलाला कधी गुलाबाची सर येत नाही निरर्थक आहेत तुझी पदवी अन् पदवीका साऱ्या थकलेल्या आई बापाची जर तुला कदर येत नाही कागदी फुलाला कधी गुलाबाची सर येत नाही कु.वर्षा गोविंद कंकाळ सिंदखेडराजा, जिल्हा-बुलढाणा

Home » कागदी फुल…
previous post