📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 28, 2026
कविता

कानोसा

Kanosa Chandrashekhar Kasar Poem

मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. काही ठिकाणी पाऊस झाला आहे तर काही ठिकाणे अद्याप कोरडीच आहेत. पेरणी खोळंबल्या आहेत. या परिस्थितीवर कानोसा ही धुळे येथील चंद्रशेखर प्रभाकर कासार यांनी केलेली कविता…

वाहून ये रे धावून ये रे
तू रे जरा पावसा

अंत नको पाहू आता
घे रे माझ्या मनाचा
थोडासा जरासा
कानोसा

वाहून ये रे धावून ये रे
तू रे जरा पावसा

धरणी तापली
कोरडं पडली
माती बी सुकली
ढेकूळ फोडाया
ये रे आता

वाहून ये रे धावून ये रे
तू रे जरा पावसा

नदी ही आटली
पाने ही गळाली
शिवार ओसाडं
भिजवं आवार आतां

वाहून ये रे धावून ये रे
तू रे जरा पावसा

कर्जाचा डोंगर
सावकारी शिकार
माझा शेतकरी राजा
कृपेने वर्षावं
सोनं उगवावं
फिटेल कर्जाचा बोजा

वाहून ये रे धावून ये रे
तू रे जरा पावसा

अंत नको पाहू आता
घे रे माझ्या मनाचा
थोडासा जरासा
कानोसा

चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
7588318543.

Related posts

आई काय असे ते आज मला कळत आहे

मेघराजा का रे तू…

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406