May 27, 2024
Kusumtai Patil award to Dr Nitin Babar book Arthpravah
Home » डॉ. नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह पुस्तकाला पुरस्कार
काय चाललयं अवतीभवती

डॉ. नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह पुस्तकाला पुरस्कार

शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र असोसिएशनचा राज्यस्तरीय कुसुमताई राजारामबापू पाटील ‘उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार डॉ. नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह या पुस्तकाला देण्यात आला आहे. तीन हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र असोसिएशन ( सुयेक ) आणि बळवंत कॉलेज विटा यांच्यावतीने आयोजित ३३ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. सुयेकचे माजी अध्यक्ष, माजी प्राचार्य डॉ अर्जुनराव महाडीक यांच्या हस्ते डॉ. बाबर यांना विटा येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्र मोरे, सुयेकचे अध्यक्ष प्रा डॉ राहूल म्होपरे, माजी अध्यक्षा प्राचार्या डॉ. तेजस्वीनी मुडेकर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. एम. जी. पाटील, शिवार्थ संपादक प्रा. डॉ. जयंत इंगळे, सचिव प्रा. संजय धोंडे, डॉ. प्रविण बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बाबर हे सांगोला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सातत्याने त्यांचे शेती , ग्रामीण अर्थकारणावर संशोधनात्मक लेख विविध वर्तमान पत्रात प्रकाशित होत असतात. म्हणूनच यावर्षी सुयेकमार्फत त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल माजी कुलगुरू योगेंद्र नेरकर, जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. भालबा विभुते, शिवाजी विद्यापीठ अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख. जेष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. विजय ककडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

त्यांना कै. प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष ता. ना. केदार, प्रा. पी. सी. झपके तसेच सचिव म. सि. झिरपे व इतर सर्व संस्था सदस्य तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, माजी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. मधूसुदन बचूटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर महाविद्यालयातील इतर सर्व सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन अधिक्षक पी.एस. शिंदे तसेच चोपडी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले .

Related posts

12 महत्वपूर्ण आणि युद्धपयोगी खनिजांच्या खाणकाम संदर्भातील स्वामित्वशुल्क दरास मंजुरी

नालायक, कोडगा, वेडा, मूर्ख, काय हे…

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमुख कारण कोणते?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406